अ‍ॅसिडच्या टँकरने दोघांना चिरडले

By admin | Published: April 18, 2015 11:33 PM2015-04-18T23:33:46+5:302015-04-18T23:33:46+5:30

अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड घेऊन भरधाव जात असताना टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकरची दुचाकीला धडक बसून तो पलटी झाला.

The acid chopped the two with a tanker | अ‍ॅसिडच्या टँकरने दोघांना चिरडले

अ‍ॅसिडच्या टँकरने दोघांना चिरडले

Next

नीरा : अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड घेऊन भरधाव जात असताना टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकरची दुचाकीला धडक बसून तो पलटी झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दौंडज (ता. पुरंदर) येथील पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर हा अपघात घडला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे मंगेश लक्ष्मण कदम (वय २३, रा. दौंडज, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि सुरेखा नामदेव यादव (४५, माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथून नीरालगत निंबूत (ता. बारामती) येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडची वाहतूक करणाऱ्या टँकर (एमएच ०४-एफयू ६५९१)वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकून
पलटी झाला.
अपघातानंतर टँकरमधील अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडची गळती होऊ लागल्याने पालखी मार्गासह दौंडज परिसरात घातक दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर पसरू लागली. परिणामी, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारक आणि प्रवाशांना नाकाला रुमाल लावून जावे लागत होते. डोळ्यांना अ‍ॅसिडच्या झळा लागत होत्या. पोलिसांना या अपघाताची खबर मिळताच पोलीस निरीक्षक रामदास शेळके आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासमवेत तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
(वार्ताहर)

४घटनास्थळी ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलासमवेत पोहोचण्यास बराच विलंब लावला. अखेर नीरा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव हे ज्युबिलंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अग्निशमन दलासमवेत घेऊन घटनास्थळी उशिरा पोहोचले. त्यानंतर आणखी जादा क्रेन आणून तसेच अ‍ॅसिडच्या तीव्रतेवर प्राथमिकरीत्या अग्निशामक दलाच्या मदतीने नियंत्रण आणून अखेर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.

Web Title: The acid chopped the two with a tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.