अ‍ॅसिड पिलेल्या महिलेची पचनव्यवस्था झाली पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:07 PM2018-04-07T14:07:57+5:302018-04-07T14:07:57+5:30

एका ४५ वर्षीय महिलेने घरात वाद झाल्याच्या रागातून अ‍ॅसिड पिले होते. त्यामुळे तिच्या अन्ननलिका व जठराला इजा झाल्याने पाणी पिणेही शक्य होत नव्हते.

acid drinking women digestive system has been restored | अ‍ॅसिड पिलेल्या महिलेची पचनव्यवस्था झाली पूर्ववत

अ‍ॅसिड पिलेल्या महिलेची पचनव्यवस्था झाली पूर्ववत

Next
ठळक मुद्देससूनमध्ये जठर आणि अन्ननलिकेवर यशस्वी उपचार  

पुणे : घरगुती वादातून अ‍ॅसिड पिल्याने एका महिलेच्या अन्ननलिका व जठराला इजा झाली होती. त्यामुळे तिला काहीही खातापिता येत नव्हते. ससून रुग्णालयामध्ये अन्ननलिका व जठराला झालेल्या इजांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. आता ही महिला व्यवस्थितपणे जेवण करू लागल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. एका ४५ वर्षीय महिलेने घरात वाद झाल्याच्या रागातून अ‍ॅसिड पिले होते. त्यामुळे तिच्या अन्ननलिका व जठराला इजा झाल्याने पाणी पिणेही शक्य होत नव्हते. सतत उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू होता. वजनही जवळपास दहा किलो कमी झाले. त्यानंतर ससून रुग्णालयातील मेडिसीन विभागातील नवीन अद्ययावत झालेल्या गॅस्ट्रोइंटरलॉजी विभागात या महिलेला आणण्यात आले. प्राथमिक चाचणीनंतर तोंडावाटे दुर्बिणीतून तपासणी करण्यात आली. अ‍ॅसिडमुळे झालेल्या इजेमुळे जठर खूप लहान झाले होते. तसेच त्यास जखमाही झाल्या होत्या. जठराकडून छोट्या आतड्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याचे आढळून आले.सुरुवातीला बलूनने जठराचा निमुळता भाग मोठा करण्याचा प्रयत्न केला गेला. पण जठराचा निमुळता भाग बराच मोठा असल्याने या प्रयत्नात यश आले नाही. नंतर जठराच्या निमुळत्या भागामध्ये स्टेण्ट टाकण्यात आले. दोन दिवसानंतर तोंडावाटे दुर्बिणीतून तपासणी केली असता निमुळता भाग बऱ्यापैकी मोठा झाला होता. पाणीही न पिता येण्याजोगी महिलेची परिस्थिती उपचारापूर्वीं  होती. आता ती महिला व्यवस्थितपणे जेवणही करू लागली आहे. या उपचार पद्धतीमुळे रुग्णाची मोठी शस्त्रक्रिया टळली. ससून रुग्णालयामध्ये अशा प्रकारची उपचार पद्धती वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. अत्यंत माफक खर्चात हे उपचार यशस्वी झाले. अशा प्रकारची उपचार पद्धती ठराविक रुग्णालयातच उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. गॅस्ट्रोइंटरलॉजी विभागातील डॉ. विनय थोरात, डॉ. सुनील पवार, डॉ. नागनाथ रेडेवाड व भूलतज्ञ डॉ.गायत्री तडवलकर यांनी अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले व मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. शशिकला सांगळे यांचे मार्गदर्शनाखाली महिलेवर उपचार केले.     

Web Title: acid drinking women digestive system has been restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.