Pune | नीरा येथील ज्युबिलंट इनग्रेव्हिया कंपनीत ऍसिडची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 14:12 IST2023-03-31T14:10:54+5:302023-03-31T14:12:53+5:30
कंपनी प्रशासनाने कोणतीही दुर्घटना यादरम्यान झाली नसल्याचे सांगितले...

Pune | नीरा येथील ज्युबिलंट इनग्रेव्हिया कंपनीत ऍसिडची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नीरा (पुणे) : पुरंदर - बारामतीच्या सीमेवर नीरा येथे असलेल्या ज्युबिलंट इनग्रेव्हिया कंपनीत ऍसिडची गळती झाली आहे. त्यामुळे परिसरात उग्रवास येत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले. मात्र कंपनी प्रशासनाने कोणतीही दुर्घटना यादरम्यान झाली नसल्याचे सांगितले आहे.
ज्युबिलंट इनग्रेव्हिया कंपनीच्या एक प्लांटमध्ये ऍसिड वाहून नेणाऱ्या पाईपच्या जोडामध्ये (फ्रांझ) असलेले रबर उन्हाळ्यामुळे खराब झाले होते. त्यामधून दहा मिनिटे ऍसिटिक ऍसिडची गळती झाली. शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११:३० ही ऍसिड गळतीची व उग्रवास परिसरात येत असल्याची घटना घडल्याची बातमी नीरा गावात वाऱ्यासारखी परसली. या बातमीमुळे नीरा शहरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कंपनीच्या जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही ऍसिड गळती काही क्षणापुर्ती झाली होती. देखभाल दुरुस्ती दरम्यान उग्रवास येत असल्याचे निदर्शनास आल्याने तातकाळ सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही. या अपघातात कोणालाही साधी चक्कर ही आली नाही.