गणेशोत्सव २०१९ - कलाकारांचा अभिनय ठरतो देखाव्यांचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 11:45 AM2019-08-30T11:45:18+5:302019-08-30T11:49:27+5:30

पूर्वी मंडळे ऐतिहासिक व धार्मिक विषय हाताळण्यास प्राधान्य देत असे.

The acting of the artist leads to the attraction of the live scenes in ganeshotsav | गणेशोत्सव २०१९ - कलाकारांचा अभिनय ठरतो देखाव्यांचे आकर्षण

गणेशोत्सव २०१९ - कलाकारांचा अभिनय ठरतो देखाव्यांचे आकर्षण

googlenewsNext
ठळक मुद्देछोट्या नाटिका सादर : जिवंत देखावे सादर करण्याकडे वाढतोय कलअनेक संस्थांचे ग्रुप मंडळांच्या देखाव्यांमध्ये नाटिका करतात सादर गणेशोत्सवाच्या तीन ते चार दिवस अगोदर या ग्रुपचा सराव सुरू

अतुल चिंचली 
पुणे : गणेशोत्सवात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक असे जिवंत देखावे सादर केले जातात. देखाव्याच्या लहान नाटिकेतून कलाकारांची मेहनत दिसून येत असते. कलाकारांचा अभिनय देखाव्यांचे आकर्षण ठरत आहे, असे मत गणेशोत्सवात नाटिका सादर करणाऱ्या संस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 
पूर्वी मंडळे ऐतिहासिक व धार्मिक विषय हाताळण्यास प्राधान्य देत असे. काही काळाने सामाजिक विषय हाताळण्यास सुरुवात झाली. आता नाटिकेतून जिवंत देखावे दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कलाकारांना व्यासपीठ मिळू लागले. अनेकांना अभिनय करण्याची आवड असते. पण ती पूर्ण करण्यासाठी मार्ग मिळत नाही. मंडळाच्या देखाव्यात हीच संधी मिळत आहे. दिवसभर काम करून आपली हौस पूर्ण करण्यासाठी ते काम करतात. या नाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त तरुण मुले, मुली काम करत नाहीत. तर लहान मुलांपासून ज्येष्ठही हौस म्हणून सहभागी होतात. 
अनेक संस्थांचे ग्रुप मंडळांच्या देखाव्यांमध्ये नाटिका सादर करतात. गणेशोत्सवाच्या तीन ते चार दिवस अगोदर या ग्रुपचा सराव सुरू होतो. बरेच कलाकार व्यवसाय, नोकरी करून येत असल्याने सराव सायंकाळच्या वेळेतच असतो. दिवसभर काम करूनही सर्व कलाकार आतिशय हौशेने सरावाला उपस्थित राहतात.  श्रीमानयोगी नाट्यसंस्थेचे योगेश शिरोळे म्हणाले, दहा ते बारा वर्षे झाली ही संस्था चालवत आहे. सध्या कलाकार हौस म्हणून अभिनय करत आहेत. ते कधीही मानधनाची अपेक्षा करत नाहीत. पण त्यांना पुरस्कार स्वरूपात पैसे दिले जातात. आम्ही देखाव्यांमध्ये ऐतिहासिक बरोबरच सामाजिक विषयांना प्राधान्य देतो. देखाव्यांमधील नाटिका हे समाजप्रबोधनाचे उत्कृष्ट माध्यम आहे. यंदा तीन मंडळांमध्ये नाटिका सादर करणार आहोत. 
.........
आयसाईट क्रिएशनच्या अंतर्गत मी अठरा, वीस वर्षांपासून काम करत आहे. आम्ही नाटिका सादर करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांची निवड करतो. त्यांची मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा होते. अंतिमत: सामाजिक किंवा ऐतिहासिक विषय निवडून सरावाला सुरुवात होते. नाटिकेतूनही कलाकारांना अभिनय केल्याचे समाधान मिळते. यासाठी ग्रुपचे व्यवस्थापन फारच महत्वाचे आहे. मंडळाने दिलेल्या जागेत समायोजन करणे. हेच आमच्यासमोरचे आव्हान असते. 
- संतोष राऊत, हायसाईट क्रिएशन 
...........
पूर्वीच्या हलत्या मूर्तींची जागा जिवंत देखाव्यांनी घेतली आहे. देखाव्यात सादर होणाºया नाटिकेतून जिवंतपणा दिसून येतो. नाटिकेतील कलाकारांच्या चेहºयावरील हावभाव, अभिनय प्रेक्षकांना धरून ठेवते. कलाकारांच्या मेहनतीमुळे नाटकात चैतन्य आणि विविधता दिसून येते. या नाटिका म्हणजे कलाकार तयार होण्याचे व्यासपीठ आहे. मी गेली दहा वर्षे हे काम करत असून शंभर कलाकारांचा आमचा ग्रुप आहे. 
वृंदा साठे, वृंदा साठे सहकारी ग्रुप
......................
दिग्दर्शन व लेखन करणाºया लोकांची मदत घेतात
शहरातील काही मंडळाचे कार्यकर्ते या नाटिका बसवतात. त्यासाठी दिग्दर्शन व लेखन करणाऱ्या लोकांची मदत घेतली जाते. कार्यकर्त्यांनाही कलाकार होण्याची संधी मिळत आहे. शहरातील साईनाथ मंडळ, जयजवान मंडळ, जय बजरंग मंडळ, सुयोग मित्र मंडळ या मंडळातील कार्यकर्ते जिवंत देखाव्यात सहभागी होतात. 

Web Title: The acting of the artist leads to the attraction of the live scenes in ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.