सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनकवडी व सहकारनगर परिसरातील दहा मंदिरांवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 04:11 PM2018-12-15T16:11:53+5:302018-12-15T16:27:12+5:30

स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे चारपर्यंत ही कारवाई करण्यात आली. 

Action on 10 Temples in Dhankawadi and Sahkarnagar area as per Supreme Court order | सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनकवडी व सहकारनगर परिसरातील दहा मंदिरांवर कारवाई 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनकवडी व सहकारनगर परिसरातील दहा मंदिरांवर कारवाई 

Next
ठळक मुद्देमहापालिकेच्या धनकवडी - सहकारनगर आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कारवाई स्थानिकांच्या मनात प्रचंड असंतोष असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी

धनकवडी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनकवडी परिसरातील चार व सहकारनगर परिसरातील सहा अशा एकूण दहा मंदिरांवर कारवाई करुन पाडण्यात आली. 
महापालिकेच्या धनकवडी - सहकारनगर आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ते शनिवारी पहाटे चारपर्यंत ही कारवाई करण्यात आली. 
बालाजीनगर येथे जिजामाता चौक ते पवार हाँस्पिटलच्या दरम्यान तीन मंदिरांवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पवार हाँस्पिटल शेजारी असलेल्या संतसेना महाराज व ज्ञानेश्वर माऊली महाराज, जिजामाता चौकातील बालाजी मंदिर मंडळाचे गणेश मंदिर तर सर्वे नंबर १२ गोविंद हाईट्सच्या बाजूला असलेल्या सिद्धीविनायक मंदिरावर ही कारवाई करण्यात आली.धनकवडी मधील चव्हाणनगर परिसरातील शनिमारुती मंदिराच्या समोर असलेले गणपती मंदिरावरसुद्धा महापालिका अतिक्रमण विभागाने मध्यरात्री ३ वाजता कारवाई करुन पाडण्यात आले. यावेळी शेजारच्या घरानां बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या. पोलीस बंदोबस्तात रात्री हे मंदिर पाडल्यामुळे स्थानिकांच्या मनात प्रचंड असंतोष असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली आहे. 
 गणपती मंदिर शेजारी असलेल्या सर्वे नंबर ११ मधील या चाळींच्या घरांना बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या. यामध्ये रुपाली नरके, शेखर चव्हाण, अनिल नेटके, नरेश परिहार, स्वप्नील लोखंडे यांच्या घरांना कड्या लावल्या. मंदिरात झोपलेल्या अभिमान आरकडे , वय वर्षे ८५ याला काठी मारुन मंदिरातून बाहेर काढले. 
माझी महापौर नगरसेवक दत्तात्रय धनकवडे म्हणाले, कारवाई करण्याबाबत दुमत नाही. मात्र, या कारवाई पक्षपाती आहेत. भारतीय जनता पार्टीच्या मंडळांवर या कारवाया न होता राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस व इतर पक्षांच्या मंडळाच्या मंदिरांवर या कारवाया करण्यात आल्या आहेत. 
नगरसेवक प्रकाश कदम यांच्या बालाजी मित्र मंडळाचे गणेश मंदिरावर कारवाई करुन पाडण्यात आले. यावेळी कदम म्हणाले हे मंदिर तीस वर्षांपूर्वी स्थापन केले. यावेळी येथे लोकवस्ती सुद्धा नव्हती. हळूहळू लोक वस्ती वाढत गेली. मंडळाने पर्यावरण , प्रदूषण,आरोग्य यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे.त्यामुळे नागरिकांची श्रद्धा या मंदिरावर आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होऊन केल्या आहेत.

Web Title: Action on 10 Temples in Dhankawadi and Sahkarnagar area as per Supreme Court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.