नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 08:57 PM2018-09-15T20:57:38+5:302018-09-15T21:00:11+5:30

निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर नियमांचे उल्लंघन करून बस चालविणाऱ्या २६ चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने दंडात्मक कारवाई केली आहे.

Action on 26 drivers of the violating the rules of the PMP | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देपीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या आदेशावरून संबंधितांवर दंडात्मक कारवाईबीआरटी मार्गावरील बस वाहतुक सुरळीत होण्यासाठी यापुढेही अशाप्रकारची कारवाई केली जाणार

पुणे : निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर नियमांचे उल्लंघन करून बस चालविणाऱ्या २६ चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने दंडात्मक कारवाई केली आहे. प्रामुख्याने मार्गावरील सिग्नलचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई झाली. 
काही दिवसांपुर्वीच निगडी ते दापोडी हा बीआरटी मार्ग सुरू झाला आहे. बस संचलनाचे परीक्षण करताना या मार्गावर काही बसचालक नियमबाह्य पद्धतीने बस चालवित असल्याचे निदर्शनास आले. दि. १३ सप्टेंबर रोजी ही पाहणी करण्यात आली. त्यामध्ये २६ चालक सिग्नल यंत्रणेचे उल्लंघन करताना आढळले. त्यानुसार पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या आदेशावरून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पीएमपी तसेच भाडेतत्वावरील बसचालकांचाही यात समावेश आहे. बीआरटी मार्गावरील बस वाहतुक सुरळीत होण्यासाठी यापुढेही अशाप्रकारची कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 
-------------------

Web Title: Action on 26 drivers of the violating the rules of the PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.