लोणी कंद हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या २५३६ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:37+5:302021-03-20T04:10:37+5:30

मानकर म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोसायट्यांमधील क्लब हाऊसही बंद ठेवण्यात आले आहेत. लग्नसमारंभासाठी ५० लोकांनाच परवानगी असून ...

Action against 2536 people walking around Loni Kanda without mask | लोणी कंद हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या २५३६ जणांवर कारवाई

लोणी कंद हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या २५३६ जणांवर कारवाई

Next

मानकर म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोसायट्यांमधील क्लब हाऊसही बंद ठेवण्यात आले आहेत. लग्नसमारंभासाठी ५० लोकांनाच परवानगी असून हॉटेल, रेस्टॉरंट, बार, लॉज हे सर्व ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी आहे. दरम्यान, सर्व दुकाने, हॉटेल, पानटपरी, लॉजेस, किराणा दुकानदार, सार्वजनिक संस्था, बँका, विविध कंपनी, गोडावून या सर्व ठिकाणी मास्क व सॅनिटायजरचा वापर बंधनकारक असून पायी तसेच वाहनांवर कामानिमित्त फिरणाऱ्या सर्वानाच मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

होम क्वारंटाईन असणारे नागरिक पोलीस तपासणीत घरी न आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. वाढत्या कोरोना नियंत्रणाचा एक भाग म्हणून लोणी कंद पोलिसांकडून धडाकेबाज कारवाई असून याच कारवाईचा भाग म्हणून कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या ६० मंगल कार्यालय व हॉटेल व्यावसायिक यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

Web Title: Action against 2536 people walking around Loni Kanda without mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.