चायनीज मांजा विकणाऱ्यांवर ३ दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:37+5:302021-01-15T04:09:37+5:30
संक्रांतीच्या दिवशी चायनीज मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची विक्री करणार्यावर कारवाई करवाई करण्यात येत आहे. ...
संक्रांतीच्या दिवशी चायनीज मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची विक्री करणार्यावर कारवाई करवाई करण्यात येत आहे. अशा नायलॉन मांजा विक्रेत्यांचा शोध घेत असताना पोलिस कर्मचारी सचिन ढवळे व विशाल शिर्के यांना खडकी व येरवडा भागात नायलॉनचा मांजा विक्री केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खडकीत अशरफ आदिफ तांबोळी (रा. जुना बाजार) व येरवडा भागात नाझनीन अमीन पटेल (रा. जनतानगर, येरवडा) हे सणासुदीच्या काळात मांजा विक्री करताना आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार खडकी व येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खंडणी विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी प्रदीप शितोळे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड यांच्या पथकाने हसनभाई पंतगवाले याच्यावर कारवाई केली. या प्रकरणी आयाज मेहबूब शेख (वय ५५, रा. न्यू नाना पेठ) यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त बच्चन सिंग व सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
येत्या काही दिवसात चायनीज नायलॉन मांजा पुरवठा करणारे, विक्री करणारे व वापर करणार्याविरुद्ध गुन्हे शाखेतर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी त्यांची मुले पतंग उडवण्यासाठी चायनीज नायलॉन मांजाचा वापर करणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.