Pune | पुण्यात ३९२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई; वाहतूक पोलिसांचा कारवाईचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:02 PM2023-04-04T13:02:27+5:302023-04-04T13:03:10+5:30
महत्त्वाचं म्हणजे या आकडेवारी सर्वाधिक कारवाई ही पोलीस कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे...
- किरण शिंदे
पुणे :वाहतूक पोलीस फक्त सर्वसामान्य लोकांवरच कारवाई करतात म्हणून अनेकदा त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र वाहतूक पोलिसांनी आता सर्वसामान्य लोकांसोबतच स्वतःला व्हीआयपी किंवा विशेष म्हणून घेणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे. यामध्ये डॉक्टर सैन्य दलातील अधिकारी, शासकीय सेवेतील कर्मचारी यांच्यासह काही पोलिसांचा देखील समावेश आहे. वाहतूक पोलिसांनी या संदर्भातली मागील पंधरा दिवसातली आकडेवारीच जाहीर केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या आकडेवारी सर्वाधिक कारवाई ही पोलीस कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे.
मागील पंधरा दिवसात कारवाई करण्यात आलेली आकडेवारी-
मागील १५ दिवसातील चलन कारवाया...
- पोलीस - ३९२
- शासकीय सेवेतील अधिकारी - १६०
- पी एम पी एम एल - ३०
- एडव्होकेट / डॉक्टर - १५१
- सैन्यदल - ३५
- मीडिया - २७
वाहतूक पोलिसांच्या त्रासाला कंटाळून कालच पुण्यातील काही तरुणांनी अनोखी मोहीम सुरू केली होती. आमच्याकडे लायसन्स आहे आम्हाला अडवून तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवू नका असं म्हणत पुणेरी भाषेत टोमणे देखील मारले होते. मात्र या आकडेवारीतून वाहतूक पोलीस हे फक्त सर्वसामान्य लोकांनाच नाही तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक नागरिकावर कारवाई करतात हे दिसून येते.