लॉकडाऊनमध्येही ४ हजार ३४७ फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई, १७ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:05+5:302021-06-05T04:09:05+5:30

पुणे : पुणे रेल्वे स्थानक व विभागात मे महिन्यात विनातिकीट प्रवास करताना जवळपास ४ हजार ३४७ प्रवासी आढळून आले. ...

Action against 4,347 free train passengers in lockdown also, fine of Rs 17 lakh recovered | लॉकडाऊनमध्येही ४ हजार ३४७ फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई, १७ लाखांचा दंड वसूल

लॉकडाऊनमध्येही ४ हजार ३४७ फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई, १७ लाखांचा दंड वसूल

Next

पुणे : पुणे रेल्वे स्थानक व विभागात मे महिन्यात विनातिकीट प्रवास करताना जवळपास ४ हजार ३४७ प्रवासी आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करून जवळपास १७ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मे महिन्यात लॉकडाऊन असताना, शिवाय अनेक गाड्या रद्द असतानादेखील अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना मोठ्या प्रमाणात आढळून आले. वाणिज्य विभागाने रेल्वे स्थानक व गाडीत विशेष मोहीम राबवून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. अनियमित तिकीट काढून प्रवास करणे व क्षमतेपेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास करणाऱ्या ४१ प्रवाशांवर कारवाई करून १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सहर्ष वाजपेयी व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

Web Title: Action against 4,347 free train passengers in lockdown also, fine of Rs 17 lakh recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.