उरुळी कांचनमध्ये तीन दिवसांत ५२ नागरिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:07+5:302021-04-18T04:11:07+5:30

--- उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस व उरुळी कांचन ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी ...

Action against 52 citizens in three days in Uruli Kanchan | उरुळी कांचनमध्ये तीन दिवसांत ५२ नागरिकांवर कारवाई

उरुळी कांचनमध्ये तीन दिवसांत ५२ नागरिकांवर कारवाई

Next

---

उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस व उरुळी कांचन ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन व परिसरात मास्कचा वापर न करणार्‍या, विनाकारण मोटरसायकलवर फिरणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५२ नागरिक व दुकानदारांकडुन मागील तीन दिवसात १६ हजार ८७० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी दिली.

उरुळी कांचन मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळातच सर्व व्यवहार चालू ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू केली आहे.

दुकानदार, भाजीवाले, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदा पाचशे रुपये, तर दुसऱ्यांना मास्क न घातल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरूद्ध एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दंडात्मक रक्कम वसूल करण्याची कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार, पोलिस हवालदार अमोल भोसले, शिवाजी बनकर, राहुल कर्डिले, भारती होले व ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत गायकवाड, प्रथमेश ढवळे करीत आहेत.

--

फोटो क्रमांक : १७ उरुळी कांचन तीन दिवसांत नागरिकांवर कारवाई

फोटो ओळ : उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील बिनामास्क नागरिकांच्यावर कारवाई करताना पोलिस व ग्रामपंचयात कर्मचारी

Web Title: Action against 52 citizens in three days in Uruli Kanchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.