नियम मोडणाऱ्या सहाशे नागरिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:01+5:302021-04-27T04:10:01+5:30
लष्कर पोलीस स्टेशनचे ११० पोलीस कर्मचारी ३५ एसपीओ विशेष पोलीस अधिकारी व विविध महाविद्यालयाचे २५ पोलीस मित्र तरुण हे ...
लष्कर पोलीस स्टेशनचे ११० पोलीस कर्मचारी ३५ एसपीओ विशेष पोलीस अधिकारी व विविध महाविद्यालयाचे २५ पोलीस मित्र तरुण हे लष्कर भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अहोरात्र काम करत आहे.
लॉकडाऊन लागायच्या आगोदर दररोज ५० ते शंभर नागरिकांवर कार्यवाही होत होती. तर ती आता लॉकडाऊन लागल्यानंतर दिवसाला १५ ते २० नागरिक अशी झाली आहे.
आपले कर्तव्य बजावत असताना पोलीस स्टेशनचे १७ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून, येथील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे लसीकरणाची २ डोस पूर्ण झाले असल्याने त्यांना या करोना लागणीचा फार परिणाम झाला नाही. ते गृहविलगीकराणात उपचार घेत आहेत.
लष्कर भागातील गुरुद्वारा, अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे, नागरिक नियमित आमच्या जेवणाची, पाण्याची, चहा, ज्यूस वैगरेची सोय करत असतात. त्यामुळे नागरिकांचे धन्यवादच. परंतु आपल्यालाही काही आवश्यक्यता असेल. कोरोनाबाधित नातेवाइकांना, गरीब, भिक्षेकरू यांना काही मदत लागत असेल तर नजीकच्या पोलीस चौकी, एसपीओ, पोलीस मित्र यांच्याशी संपर्क साधा. परंतु विनाकारण बाहेर पडू नका असे आव्हान देखील लष्कर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कार्यवाही करण्यापूर्वी पोलिसांनी नागरिकांशी प्रेमाने, बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि नागरिकही त्यांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. पोलीस तुमच्यासाठीच आहेत त्यांना सहकार्य करा. विनाकारण बाहेर पडू नका. लसीकरणाने आपण कोरोनाला हरवू. -अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर