लग्नाच्या वरातीतील डीजेवर कारवाई, चार जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:18 AM2021-02-23T04:18:04+5:302021-02-23T04:18:04+5:30
: लग्नाच्या वरातीत डीजे लावून शंभर ते दीडशे जणांची गर्दी जमविण्या प्रकरणी आळेफाटा पाेलिसांनी चाैघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
: लग्नाच्या वरातीत डीजे लावून शंभर ते दीडशे जणांची गर्दी जमविण्या प्रकरणी आळेफाटा पाेलिसांनी चाैघांवर गुन्हा दाखल केला आहे. दहा लाख रुपये किमतीच्या दाेन डीजे गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.
आळे गावच्या हद्दीत दोन डीजेंवर कारवाई करत चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. ए. पवार यांनी दिली. पोलीस काॅन्स्टेबल सचिन डामसे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात संभाजी मुरलीधर सहाणे, रा. आळे ता. जुन्नर, पुणे व सूरज प्रकाश औटी, राजुरी, ता. जुन्नर, जि. पुणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. डामसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत, असे असतानाही आळे येथील ज्ञानोबा मंदिराशेजारी संभाजी मुरलीधर सहाने रा. आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांच्या पुतण्याच्या लग्नाच्या वरातीच्या कार्यक्रमानिमित्त डीजे सिस्टीम आणली हाेती. मोठ्या आवाजात अंदाजे शंभर ते दोनशे लोक सहभागी करून गर्दी करण्यात अाली. त्यांच्यािविरुधद भारतीय दंड विधान कलम 188 269 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 सह साथीचे रोग कायदा कलम 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या प्रकारात लक्ष्मण भीमा रानाळे यांच्या मुलाच्या लग्नाचे वरातीतही डीजे लावून शंभर ते दीडशे लाेकांनाा गाेळा करण्यात आले हाेते. याप्रकरणी प्रवीण शिवाजी जाधव (रा. ठाकरवाडी, वडगाव आनंद) याच्याावर गुन्हा दाखल करण्यात आलाा आहे. यामध्ये सुरक्षित अंतर न ठेवता अनेक जणडान्स करत होते. त्यांच्या ताेंडाला मास्क नव्हते. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. ए. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एन. आर. कारखिले
करत आहेत.