विदेशी सिगारेट विकणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:58 PM2019-09-24T18:58:19+5:302019-09-24T19:01:02+5:30
आरोग्यास हानीकारक असा इशारा लिहिलेला नसलेल्या विदेशी सिगारेट विकणाऱ्या एका विक्रेत्यावर सिंहगड रस्ता पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून धमेंद्र कुमार मौर्य (वय २८, रा. नऱ्हे, पुणे) या विक्रेत्यावर कोप्ता कायद्याच्या अंतर्गत खटलाही दाखल करण्यात आला आहे.
पुणे (नऱ्हे) : आरोग्यास हानीकारक असा इशारा लिहिलेला नसलेल्या विदेशी सिगारेट विकणाऱ्या एका विक्रेत्यावर सिंहगड रस्ता पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून धमेंद्र कुमार मौर्य (वय २८, रा. नऱ्हे, पुणे) या विक्रेत्यावर कोप्ता कायद्याच्या अंतर्गत खटलाही दाखल करण्यात आला आहे.
आरोग्यास हानीकारक असा इशारा लिहिलेला नसलेल्या विदेशी सिगारेट विकणाऱ्या धमेंद्र याच्या दुकानावर सिंहगड पोलिसांनी छापा टाकून त्याच्यावर खटलाही दाखल केला आहे. सिंहगड पोलीस ठाणे हद्दीतील वडगांव बुद्रुक येथे विदेशी सिगारेट विक्री केल्या जात होत्या. या सिगारेटवर आरोग्यास हानीकारक असा वैधानिक इशारा लिहिलेला नव्हता. सिंहगड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक उमरे व पथकाने या दुकानावर छापा टाकला. यावेळी दुकानामध्ये विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला. पोलिसांनी विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई सुरू केली असून मागील आठवड्यात भारती विद्यापीठ, खडक,समर्थ पोलीस स्टेशनच्या भागांत मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेटचा साठा अवैधरित्या विक्री करतांना पकडून संबंधीत गुन्हेगारांवर कोप्ता कायद्याच्या अंतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत.