रेमडीसेव्हरचा गैरवापर करणा-या हाॅस्पिटलवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:12 AM2021-04-07T04:12:08+5:302021-04-07T04:12:08+5:30
- रेमडीसेव्हरच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ...
- रेमडीसेव्हरच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यात गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांच्या रेमडीसेव्हरची मागणी वाढत आहे. यामुळेच रेमडीसेव्हरची मागणी आणि काळाबाजार पण वाढला आहे. यामुळेच जिलाहाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी रेमडीसेव्हरचा गैरवापर करणा-या हाॅस्पिटलवर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच रेमडीसेव्हरच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात शासनाने सर्व हाॅस्पिटलसाठी कोविड प्रोटोकॉल ठरवून दिला आहे, यात हॉस्पीटलमधील रुग्णसंख्या,रेमडीसेव्हरचा वापर याबाबत मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. गरजेनुसार मर्यादित साठा खरेदी करावा. जास्तीचा साठा खरेदी करुन ठेऊ नये. हॉस्पिटल कोवीड वॉर्ड मध्ये रेमडीसेव्हर वापराबाबत रजिस्टर तयार कराचे, त्यामध्ये पेशंटचे नाव व पत्ता, औषधाचे नाव, समुह क्रमांक, बापरलेली संख्या व आकारलेली किंमत याबाबीचा समावेश करावा.काही कारणाने रेमडीसेव्हर औषधाचा पूर्ण डोस देण्यात आला नाही तर त्याचा उर्वरीत साठा हॉस्पीटल फामांसी किंवा रुग्णांच्या नातेवाईकास परत करावा व त्याबाबतचे रेकॉर्ड ठेवावे. कोवीड वॉर्डात काम करणारे कर्मचारी यांचेवर बारीक लक्ष ठेवावे व हॉस्पिटलमध्ये गरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. हॉस्पिटल मध्ये गैरप्रकार आढळून आल्यास हॉस्पिटल व्यवस्था जबाबदार धरण्यात येईल
5) कोवीड वॉर्डात काम करणारे कर्मचारी यांचेवर बारीक लक्ष ठेवावे हॉस्पिटल गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. हॉस्पीटल मध्ये गैरप्रकार आढळून आल्यास हॉस्पीटल व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल.
---
अशी असेल समिती
कोवीड-19 च्या गरजू रुग्णांना तत्काळ उपचार होण्याच्या दृष्टीकोनातून वरील कार्यपध्दतीचे अवलंबन यावे. तसेच अन्न व औषध कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून सदर नियंत्रण कक्षातील अधिकारी यांचे संपकांसाठी दुरध्वानी क्रमांक खालील प्रमाणे आहे.
1) विवेक खेडेकर औषध निरीक्षक मो. 9923125554 2) अतिष सरकाळे औषध निरीक्षक मो. 9890165018
3) श्रुतीका जाधव औषध निरीक्षक मो.9604973394
4) विजय नंगरे औषध निरीक्षक मो. 7387561343