वडगाव मावळमध्ये हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई; तब्बल २५ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:51 PM2023-08-29T16:51:11+5:302023-08-29T16:54:36+5:30
हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई...
- विजय सुराणा
वडगाव मावळ (पुणे) : पर्यटनासाठी जाणाऱ्या हुल्लडबाजांवर वडगाव तळेगाव फाट्यावर वडगाव पोलिसांनी कारवाई करून तीन महिन्यांत २५ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
पुणे पिपरी-चिंचवड इतर ठिकाणचे पर्यटक लोणावळा, खंडाळा, पवनाधरण तसेच आंदर मावळात दर शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणावर जातात. या पर्यटकांच्या वाहनांची तपासणी वडगाव तळेगाव फाट्यावर केली जाते. काही पर्यटक दुचाकीवर ट्रीपल सीट, काही मोटारीला काळी फिल्म, बेल्ट न लावता वाहन चालवणे, विनापरवाना, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा विविध प्रकारचे दावे दाखल केले आहेत. पर्यटकांविरुद्ध २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. वडगाव तळेगाव फाटा हा मुख्य चौक असून, द्रुतगती महामार्ग, पुण्याकडून येणारी व जाणारी तसेच चाकण बाजूची सर्व वाहने या चौकात येतात.
हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई
हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी लोणावळा विभागाचे पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी मिथुन धेंडे, संदीप चौधरी, चेतन कुंभार व अन्य पोलिसांचे एक पथक नेमले आहे. या पथकाने हुल्लडबाज पर्यटकांवर तीन महिन्यांत ३ हजार २४९ केसेस करून २५ लाख २ हजार ३०० रुपये दंड ठोठावला आहे.