‘सोनाई दूध’वर कारवाई होणार
By admin | Published: June 20, 2016 01:05 AM2016-06-20T01:05:08+5:302016-06-20T01:05:08+5:30
वेल्हे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सोनाई दूध वाहतूक संस्थेने हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सोनाई दूध वाहतूक संस्थेने हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी प्रसिद्धिपत्रकात दिली.
त्यांनी पत्रकात म्हटले आहे
की, वेल्हे तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची पाहणी आपण गटविकास अधिकारी गोकूळदास बैरागी यांनी केली होती. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे यांनी गावे टंचाईग्रस्त असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता.
त्यानंतर १० मे ला जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी टेकपोळे, मेटपिलावरे, चराटवाडी, वरोती, गेळगाणी, कुसारपेठ यांनी मंजुरी देऊन टँकर
सुरू करण्याचे आदेश पुणे
जिल्ह्यात टँकर पुरवठा करणाऱ्या इंदापूर येथील सोनाई दूध संस्थेस दिले होते.
मेटपिलावरे, चराटवाडी, वरोती, गेळगाणी, कुसारपेठ या गावांना लाभशेटवार यांनी समक्ष भेट देऊन पाहणी केली असता, गावातील महिलांना व लहान मुलांना गावापासून एक ते दोन किलोमीटर वरून पायपीट करावी लागत असल्याचे दिसून आले.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लाभशेटवार यांनी वारंवार सोनाई दूध संस्थेशी संपर्क केला व टँकर न पुरवठा केल्याबद्दल नोटीस देऊन खुलासा मागितला होता.
परंतु, सोनाई संस्थेकडून कोणताही खुलासा न आल्याने दंडात्मक कारवाईपोटी १,३३,५०० रुपये दंड वसूल करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सौरभ
राव यांच्याकडे पाठविण्यात
आला आहे, अशी माहिती
तहसीलदार डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी दिली. (वार्ताहर)