टाकळी हाजीत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:04+5:302021-06-18T04:09:04+5:30
टाकळी हाजी परिसरात कवठे, जांबुत, रावडेवाडी, सविंदने, निमगाव दुडे येथे देशी-विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टीची विक्री सुरू असल्याची माहिती ...
टाकळी
हाजी परिसरात कवठे, जांबुत, रावडेवाडी, सविंदने, निमगाव दुडे येथे देशी-विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टीची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वरील गावात धाड टाकून ४० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार दारू नष्ट करून ३ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे. नीलेश काळुराम बोडरे (वय ३५), संतोष सखाराम घोडे (वय ३७), अर्चना दादाभाऊ जाधव (वय ३५), विजया यालप्पा भंडारी (वय ५५),
शारदा प्रकाश भंडारी (वय ६०, सर्व रा कवठे यमाई ता शिरूर), किसन सखाराम शिस्तार (वय ५०), छबाबाई नवनाथ पळसकर (वय ५० वर्षे, दोन्ही रा. जांबुत, ता. शिरूर. जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच सर्जेराव सोनभाऊ बारहाते (वय ३६, रा.
निमगाव दुडे, ता. शिरूर, जि. पुणे), सचिन मच्छिंद्र चौगुले (वय २२, रा. मुंजाळवाडी. कवठे यमाई, ता. शिरूर जि.
पुणे), मोहन सयद पल्ले (वय २९, रा कवठे यमाई), रामदास बबन किटे (वय ४०, रा रावडेवाडी), मीरा सचिन गायकवाड (रा. चंदननगर. कवठे यमाई), पूजा सागर चौगुले (रा. कवठे यमाई) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.