यवत येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:09 AM2021-05-01T04:09:59+5:302021-05-01T04:09:59+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व सनियंत्रण समिती सदस्यांच्या उपस्थितीत पुणे सोलापूर रस्त्याच्या सेवा मार्गिकेवर विनाकारण फिरणाऱ्या ५० लोकांची ...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व सनियंत्रण समिती सदस्यांच्या उपस्थितीत पुणे सोलापूर रस्त्याच्या सेवा मार्गिकेवर विनाकारण फिरणाऱ्या ५० लोकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. या वेळी सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे, यवत पोलीस ठाण्याचे पथक उपस्थित होते. यवतमध्ये मागील काही दिवसांत मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.
ग्रामपंचायत व प्रशासनाने अनेक वेळा आवाहन करूनदेखील काही नागरिक विनाकारण फिरत असल्याने आजची कारवाई करण्यात आली. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून मास्क व विनाकारण फिरणे टाळल्यास लवकरच कोरोना आटोक्यात येऊ शकतो, अशी चर्चा या वेळी सनियंत्रण समिती सदस्यांमध्ये केली जात होती.
यवत येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करताना पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व कर्मचारी.