बारामती तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 07:28 PM2021-04-08T19:28:19+5:302021-04-08T19:29:21+5:30

लोकमतच्या वृत्ताची घेतली दखल घेतल्याने ग्रामीण पोलिसांकडून कारवाईला सुरुवात

Action against three shopkeepers violating rules in Baramati taluka | बारामती तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई

बारामती तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई

Next
ठळक मुद्देवाढत्या कोरोना रुग्णांचे नागरिकांना गांभीर्य नाही

सांगवी: सांगवी ( ता. बारामती ) येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकानदारांवर अखेर बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, सांगवीत त्याची पुरेपूर अंमलबजावणी होताना दिसून आली नाही. 

सांगवी येथील बडे व्यावसायिकच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे अनूपालन करत या निर्बंधाला धुडकावून लावत असल्या बाबत मंगळवारी ( दि. ६ ) रोजी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत ग्रामीण पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या होटेल, चप्पलचे दुकान व एका खेळण्याच्या दुकान चालकांविरोधात त्यांचे रिपोर्ट तहसीलदार यांना पाठवून कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आता दुकानदार व नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. 


सध्या सांगवीत कोरोना रुग्णांची संख्या १८२ झाली आहे. तरीही नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. सांगवी येथील चांदणी चौक, बसस्थानक परिसरात नागरिक नियमांचे उल्लंघन करत गर्दी करत आहेत. तसेच यापुढे देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शासनाने हॉटेल मधील खाद्य पदार्थ पार्सल देण्याबाबत सूचना करून देखील सांगवीत अध्यापही काही हॉटेल चालक नागरिकांना होटेल मध्येच वडापाव, भेळ व इतर खाद्य पदार्थ देण्यात येत आहे.

 सांगवीत मोठी बाजार पेठ असल्याने पंचक्रोशीतील सात ते आठ गावांतील नागरिक खरेदी साठी मोठी गर्दी करत आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करत अनेक नागरिक अध्याप देखील विनामास्क फिरत आहेत. सहा वाजण्याच्या नंतर संचारबंदी असताना देखील बारामती - फलटण रस्त्यावर नागरिक विनाकारण मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे.

 ग्रामपंचायत कडून दवंडी देऊन नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येत आहे. तरीही अनेक नागरिक व दुकानदार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून येत आहे. देखील ग्रामपंचायत प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही. यामुळे ग्रामपंचायतने ठोस उपाययोजना करून उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मोहीम आखणे आवश्यक आहे.तसेच ग्रामीण पोलिसांनी देखील आता नियम मोडणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर कारवाईत सातत्य राहाणे गरजेचे आहे.


 

Web Title: Action against three shopkeepers violating rules in Baramati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.