मार्केट यार्डात अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:09 AM2020-12-29T04:09:56+5:302020-12-29T04:09:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्ड मधील फळ विभागात अनाधिकृतपणे शेतमालाची विक्री करणा-यांवर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कारवाई ...

Action against unauthorized fruit sellers in the market yard | मार्केट यार्डात अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई

मार्केट यार्डात अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्ड मधील फळ विभागात अनाधिकृतपणे शेतमालाची विक्री करणा-यांवर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या अनधिकृत विक्रेत्यांकडून बाजार समिती प्रशासनाने सुमारे ५ हजार ३१० रुपयांचा दंड वसूल केला आहे. फळ विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या सुचनेनुसार गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी ही कारवाई केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांमध्ये बाजार आवारात विना मास्क फिरणा-या बाजार घटकातील व्यक्ती आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यानंतर रविवार (दि.२७) अनाधिकृतपणे स्टॉल लावून शेतमालाची विक्री करणा-यांकडे बाजार समितीच्या कारवाईचा मोर्चा वळविण्यात आला. ९ अनधिकृतरित्या विक्री करणा-यांवर कारवाई करण्यात आली. ५०० रूपये दंड व त्यावर ९० रूपये जीएसटी असे एकूण प्रत्येकी ५९० रुपये बाजार समितीने संबंधितांना दंड आकारला आहे. या कारवाईमुळे अनाधिकृत विक्री करणा-यांना जरब बसणार आहे. या कारवाईचे विविध बाजार घटकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Web Title: Action against unauthorized fruit sellers in the market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.