भिगवण शहरात विनामास्क दुकानदारांवर कारवाई, १२००० रुपयाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:18 AM2021-02-28T04:18:10+5:302021-02-28T04:18:10+5:30

भिगवण शहरातील बाजारपेठेत जवळपासच्या अनेक खेडेगावातून ग्राहक खरेदीला येत असल्यामुळे कोरोना आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.व्यापारी ...

Action against unmasked shopkeepers in Bhigwan city, fine of Rs 12,000 recovered | भिगवण शहरात विनामास्क दुकानदारांवर कारवाई, १२००० रुपयाचा दंड वसूल

भिगवण शहरात विनामास्क दुकानदारांवर कारवाई, १२००० रुपयाचा दंड वसूल

Next

भिगवण शहरातील बाजारपेठेत जवळपासच्या अनेक खेडेगावातून ग्राहक खरेदीला येत असल्यामुळे कोरोना आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.व्यापारी मास्क वापरत नाहीत तर आहेत त्याचा मास्क हनुवटीच्या खाली घसरला असाल्याचे दिसून येत आहे.तर सॅनिटायझर तर दुकानातून गायब झाले आहेत.अनेक दिवस दुचाकीवर विनामास्क कारवाई करूनही कोरोना वाढत असल्याचे दिसून आल्याने भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सकाळी १० वाजता पोलीस ठाण्यातून निघत चालत व्यापारी पेठेत फेर फटाका मारण्यास सुरवात केली.यावेळी पोलिसांचा फौजफाटा सोबत न घेता साध्या वेशात माने फिरत असल्यामुळे याची माहिती कोणालाही मिळाली नाही.यावेळी माने यांनी शांतपणे प्रत्येक दुकान समोर उभे राहत ज्या दुकानात दुकानदाराने मास्क घातला नसेल आणि ग्राहकानेही मास्क घातला नसेल अशा दुकानाचे फोटो काढण्यास सुरवात केली.तसेच फोटो काढल्यावर दुकान दाराला सॅनिटायझर आहे का, असे प्रश्न विचारून माहिती घेतली.जवळपास १ ते १.५ किलोमीटर पायी चालत माने यांनी ही कारवाई केली. प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्याशी संपर्क साधला असता कारवाईत दंड वसूल करणे हा प्रशासनाचा उद्देश नसून नागरिकांची जनजागृती होत कोरोना आजाराची संख्या कमी करणे हा असल्याचे सांगितले.तर दिवसभरात विनामास्क ३१ दुचाकी स्वारांवर केलेल्या कारवाईत ६२०० ,२२ दुकान आस्थापना हॉटेलवर केलेल्या कारवाईत ११००० दंड वसूल करण्यात आल्याचे तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर १८०० असा जवळपास १९००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती दिली.

Web Title: Action against unmasked shopkeepers in Bhigwan city, fine of Rs 12,000 recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.