आळंदीत विनामास्क व्यावसायिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:14 AM2021-02-27T04:14:34+5:302021-02-27T04:14:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील व्यावसायिक आस्थापनात विनामास्क तपासणी मोहिमेत पथकाने १६ दुकानदारांवर ...

Action against unmasked traders in Alandi | आळंदीत विनामास्क व्यावसायिकांवर कारवाई

आळंदीत विनामास्क व्यावसायिकांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील व्यावसायिक आस्थापनात विनामास्क तपासणी मोहिमेत पथकाने १६ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून ८ हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

या कारवाईत खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी मार्गदर्शन केले. या कारवाई प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, विशाल बासरे, सागर भोसले, अर्जुन घोडे, मल्हारी बोरगे, गजानन गायकवाड, सोमनाथ वैरागे, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र शेंडे आदींनी भाग घेतला.

यावेळी कोरोना महामारीचे संकट रोखण्यास प्रशासनाने केलेल्या सूचना, उपाययोजना, दिलेले आदेश यांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले. विनामास्क फिरणारे व व्यावसायिक यांचेवर नियमित कारवाई केली जाणार असल्याचे कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे यांनी सांगितले.

चौकट : खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या आदेशानुसार आळंदी शहरात शुक्रवारपासून (दि.२६) माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत कोमॉर्बिड व फ्लूसदृश लोकांचा ‘घर टू घर’ जाऊन सर्वे सुरू करण्यात आला आहे. आजच्या दिवसात ४९ टीमच्या माध्यमातून एकूण ७१५ कुटुंबातील सुमारे २३२४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २१ संशयित रुग्ण आढळून आले असून सर्वांची तपासणी केली असता संबंधित सर्वजण निगेटिव्ह आले आहेत.

- आळंदी शहरात ‘घर टू घर’ जाऊन तपासणी मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.

Web Title: Action against unmasked traders in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.