गरिबांवर उपचारास टाळाटाळ करणा-यांवर कारवाई, अनामत रक्कम भरल्याशिवाय नाहीत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:53 AM2017-10-26T00:53:11+5:302017-10-26T00:53:13+5:30

पुणे : अनामत रक्कम (डिपॉझिट) भरल्याशिवाय रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाºया खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या वतीने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

Action on the avoidance of misuse of the poor, treatment without paying the deposit amount | गरिबांवर उपचारास टाळाटाळ करणा-यांवर कारवाई, अनामत रक्कम भरल्याशिवाय नाहीत उपचार

गरिबांवर उपचारास टाळाटाळ करणा-यांवर कारवाई, अनामत रक्कम भरल्याशिवाय नाहीत उपचार

Next

पुणे : अनामत रक्कम (डिपॉझिट) भरल्याशिवाय रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाºया खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या वतीने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ‘बॉम्बे नर्सिंग होम’ या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात यावी, असे लेखी आदेश आरोग्य उपसंचालकांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाला दिले आहेत.
शहरातील सर्व बड्या रुग्णालयांनी धर्मादायच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या जमिनी नाममात्र किमतीला शासनाकडून घेतल्या. या रुग्णालयांना दरवर्षी लाखो रुपयांचा कर व इतर गोष्टींमध्ये सवलत दिली जाते. परंतु ही रुग्णालये सर्वसामान्य व गरीब रुग्णांना अनामत रक्कम (Þडिपॉझिट) भरल्याशिवाय दाखल करून घेत नाहीत. डिपॉझिट भरले नाही तर रुग्णांवर उपचार करण्यास काही रुग्णालये टाळाटाळ करतात. यामध्ये जर तातडीच्या उपचारांची गरज असलेला रुग्ण असेल आणि त्याच्या नातेवाइकांकडे जर डिपॉझिट भरायला पैसे नसतील तर त्याचा जीवही जाऊ शकतो. त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.
शहरातील धर्मादाय रुग्णालये ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कार्यकक्षेत येतात. बाकीची खासगी रुग्णालये ही महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत येतात. धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन तर १० टक्के खाटा या गरीब रुग्ण यांच्यासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तसेच या रुग्णांवर अनुक्रमे मोफत आणि ५० टक्के सवलतीत उपचार करणे आवशक आहे. या निकषांत बसणाºया कोणत्याही रुग्णाला धमार्दाय रुग्णालयांत डिपॉझिट मागणी करत उपचार नाकारले जात असतील तर त्यांनी धर्मादाय कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी केले.
>कार्यालयांनी रुग्णांच्या तक्रारी सोडवाव्यात
डिपॉझिटविषयक तक्रारींचा निपटारा महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि धर्मादाय कार्यालयाच्या अंतर्गत येतो. दोन्ही कार्यालयांनी रुग्णांच्या तक्रारी सोडवाव्यात, असे पत्र देण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली.

Web Title: Action on the avoidance of misuse of the poor, treatment without paying the deposit amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.