‘आरपीएफ’कडून बोगस तिकीट एजंटांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 01:04 PM2019-11-06T13:04:20+5:302019-11-06T13:06:53+5:30

पुण्यात कोंढवा येथील ‘एमके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानावर छापा टाकण्यात आला...

Action on bogus ticket agent by 'RPF' | ‘आरपीएफ’कडून बोगस तिकीट एजंटांवर कारवाई

‘आरपीएफ’कडून बोगस तिकीट एजंटांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे३८० ई-तिकिटे जप्त : मध्य रेल्वेने शहरात विविध ठिकाणी टाकला छापाप्रगती एक्स्प्रेस सोमवारपासून धावणार

पुणे : मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) बेकायदेशीरपणे ई-तिकीट विक्री करणाऱ्या एजंट व व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दि. ४ नोव्हेंबर रोजी एका दिवसात ११ लाख ६० हजार रुपये किमतीची ३८० ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आठ जणांकडील साहित्य जप्त करून त्यांना अटक करण्यात आली.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कोंढवा येथील ‘एमके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये १८ हजार ९२९ रुपये किमतीची ९ तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. तसेच सरफराज मन्सूर अली अहमद यांना अटक करण्यात आली. मार्केट यार्ड येथील यश गिफ्ट शॉपवर टाकलेल्या छाप्यात रमेश कुमार पुखराज जी जांगिड यांना ३८ हजार १९२ रुपये किमतीच्या २२ ई-तिकिटांसह अटक करण्यात आली. महादेवनगर येथील ईजी टूर्सवर टाकलेल्या छाप्यात हनुमंत शेंडगे यांना अटक करून त्यांच्याकडून  ८ हजार ९०५ रुपयांची ७ तिकीटे जप्त करण्यात आली. चिंचवडमधील संभाजीनगर येथील पाटील इंटरप्रायजेसवर छापा टाकून सोमनाथ पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३६ हजार ९८५ रुपये किमतीच्या १८ तिकिटांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. 
त्याचप्रमाणे मिरज, मुंबई व नागपूर येथेही छापेमारी करून चौघांना अटक करण्यात आली. मुंबईत प्रदीप गंगवानी आणि इकबाल बासिक अली खान यांना घाटकोपर येथून अटक झाली. त्यांच्याकडून १० लाख ४ हजार ३० रुपये किमतीची तिकिटे जप्त करण्यात आली. 
दरम्यान, मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत दि. २६ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत ४६ जणांना ९६० ई-तिकिटांसह अटक करण्यात आली. या तिकिटांची किंमत २० लाख ५५ हजार ८५३ रुपये एवढी आहे. 
............
४‘आरपीएफ’च्या पुणे विभागात दि. २६ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ई-तिकिटांची बेकायदेशीर विक्री करताना १६ जणांना पकडण्यात आले. 
४त्यांच्याकडून ३५८ ई-तिकिटे जप्त करण्यात आली. तसेच १० लाख ५७ हजार ९७८ रुपयांचा दंड वसूल करून त्यांच्याविरोधात रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय सुरक्षा आयुक्त अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 
.........
प्रगती एक्स्प्रेस सोमवारपासून धावणार
पुणे : मंकी हिल ते कर्जतदरम्यान घाट क्षेत्रात सुरू असलेल्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे रद्द करण्यात आलेली प्रगती एक्स्प्रेस दि. ११ नोव्हेंबरपासून पुन्हा धावणार आहे. ही गाडी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्याचप्रमाणे पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला दि. ६ ते १० नोव्हेंबरपर्यंत कर्जत स्थानकात   एका मिनिटाचा थांबा घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

Web Title: Action on bogus ticket agent by 'RPF'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.