दौंडच्या रुग्णालयाच्या पाणीपुरवठ्यात हलगर्जी केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:01+5:302021-03-19T04:11:01+5:30
दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाई अशा आशयाचे वृत्त लोकमतने शनिवार ( दि. १६ ) च्या अंकात प्रसिध्द ...
दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाई अशा आशयाचे वृत्त लोकमतने शनिवार ( दि. १६ ) च्या अंकात प्रसिध्द केले होते. परिणामी या वृत्ताची दखल घेत शासकीय आणि राजकीय स्तरावर तातडीने हालचाल झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाला दररोज पाच टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे.
गेल्या दीड वर्षापासून रुग्णालयाची पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तुटल्याने रुग्णालयाला तेव्हा पासून टँकरने पाणीपुरवठा सुरु होता मात्र दररोज एक टँकरचा पाणीपुरवठा अपूर्ण स्वरुपाचा होता तर टँकरच्या पाणीपुरवठ्यात सातत्यता नसल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाची होती परिणामी अपूर्ण पाणीपुरवठ्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना पाणीटंचाई निर्माण झाली होती. सध्याच्या परिस्थितीत पाच टँकरने पाणीपुरवठा सुरु झाल्याने तूर्त तरी पाणीटंचाईचे सावट दूर झाले आहे.
उपजिल्हा रुग्णालय आणि परिसराच्या नळपाणी पुरवठा योजने करिता पाणी साठवण टाकी आवश्यक असून पाण्याच्या ऊंच टाकीसाठी जागा मिळाली तर रुग्णालयासह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, याच बरोबरीने तसेच रुग्णालयाच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी योग्य ते प्रयत्न सुरु आहे. तसेच पाण्याच्या टाकीसाठी रुग्णालयाच्या परिसरातील जागेची मागणी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे .
निर्मला राशीनकर
( मुख्याधिकारी )
उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात नळपाणी पुरवठा योजनेची उंचावर टाकी बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून नगर परिषदेचा प्रस्ताव आला आहे सदरचा प्रस्ताव जिल्हाशल्य अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे.
संग्राम डांगे
( वैद्यकीय अधिकारी )
उपजिल्हा रुग्णालयात बुधवार ( दि. १७ ) पासून दररोज पाच टँकरच्या खेपा सुरु झाल्या आहे. गरज पडल्यास पाचपेक्षा अधिक टँकर दिले जातील मात्र रुग्णालयाच्या पाणीपुरवठ्याबाबत दिरंगाई केली जाणार नाही, नियमीतता ठेवण्यासाठी टँकर चालकास सूचना देण्यात आल्या आहे.
शिवदत्त भोसले
( पाणीपुरवठा अधिकारी )
दौंड उपजिल्हा रुग्णालयास टँकरने सुरु झालेला पाणी पुरवठा ( छायाचिञ : मनोहर बोडखे )