बीआरटीतील अतिक्रमणावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 06:11 AM2017-07-22T06:11:15+5:302017-07-22T06:11:15+5:30
महापालिकेमार्फत डांगे चौक ते भूमकर चौक या ४५ मी. रस्त्याचे रुंदीकरण करून मजबुतीकरणाचे काम चालू आहे. डांगे चौक ते भूमकर चौक बीआरटीएस रस्त्यावरील
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेमार्फत डांगे चौक ते भूमकर चौक या ४५ मी. रस्त्याचे रुंदीकरण करून मजबुतीकरणाचे काम चालू आहे. डांगे चौक ते भूमकर चौक बीआरटीएस रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. सुमारे तीस हजार फुटाचे १८ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.
बीआरटी मार्गावरील ताथवडे सर्व्हे क्रमांक ५१/२ मधील २४० मीटर लांबीच्या रस्त्यावर सुमारे १८ अनधिकृत बांधकामे केलेल्या मिळकतीवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामाचे एकूण क्षेत्र सुमारे ३०००० चौरस फूट इतके आहे. या मिळकती व्यापारी स्वरूपाच्या म्हणजेच गॅरेज, आॅटोमोबाईल सर्व्हिसेस, हॉटेल्स राईस मिल्स अशा प्रकारच्या होत्या. या मिळकत धारकांनी २१ जूनला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रस्त्याचे आखणी बाबत हरकत घेतली होती. ही हरकत उच्च न्यायालयाने नुकत्यात झालेल्या सुनावणीत फेटाळून लावली. भूसंपादन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांनी सर्व मिळकतधारकांना ताबा देणेबाबत नोटीस बजाविली होती.
कारवाईसाठी दोन पोकलेन चार जे.सी.बी., चार डंपर, २५ मजूर, एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, तसेच २० पोलीस व ५ महिला पोलीस असा बंदोबस्त होता. बीआरटीएसचे सह शहर अभियंता राजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.