जेजुरीत अतिक्रमणावर कारवाई सुरूच

By admin | Published: July 9, 2015 02:10 AM2015-07-09T02:10:49+5:302015-07-09T02:10:49+5:30

तीर्थक्षेत्र जेजुरीतील पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम आजही सुरू होती. मंगळवारी महामार्गाच्या डाव्या बाजूची सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली होती

Action on encroachment has been started in Jejuri | जेजुरीत अतिक्रमणावर कारवाई सुरूच

जेजुरीत अतिक्रमणावर कारवाई सुरूच

Next

जेजुरी: तीर्थक्षेत्र जेजुरीतील पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम आजही सुरू होती. मंगळवारी महामार्गाच्या डाव्या बाजूची सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली होती, आज उजव्या बाजूची अतिक्रमणे हटवण्यास सकाळपासूनच सुरूवात झाली.
अतिक्रमणे व्यवसायीक स्वत:हून हटवित होते. यामुळे कारवाई जलदगतीने होत होती. मात्र एसटी बस स्थानकासमोरील झोपडपट्टीतील अतिक्रमणे हटवताना तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी झोपडपट्टीतील महिला व पुरुषांसह जेजुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता. यामुळे काही वेळ कारवाई थांबली होती. जेजुरी पोलीस ठाण्यात प्रांताधिकारी समीर शिंगटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता विजयकुमार ठुबे, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्याशी या वेळी चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणारच आहे. झोपडपट्टीतील अतिक्रमणे स्वत:हून हलवावीत असे प्रांताधिकारी शिंगटे यांनी सांगितले. चर्चेतून झोपडपट्टीतील अतिक्रमणे स्वत:हून काढण्याची तयारी रहिवाशांनी दर्शवली. त्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आल्याची माहिती शिंगटे यांनी दिली. त्यानंतर कारवाई सुरूच होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे हटवण्यात आल्याने रस्ता मोकळा झाला आहे.
जेजुरीतील अतिक्रमणे चुकीच्या पद्धतीने हटवण्यात येत आहेत. अतिक्रमणे काढण्यासंबधीच्या लेखी पूर्व सूचना देण्यात आल्या नव्हत्या, या अन्यायी कारवाईचा निषेध करीत गेल्या पन्नास वर्षांपासून या ठिकाणी व्यवसायिक राहत आहेत, अनेक रहिवाश्यांची घरे ही पाडण्यात आलेली आहेत. त्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यांची झालेले नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जेजुरी शहर कॉँग्रेस, जेजुरी शहर व नागरी हक्क समिती तसेच व्यापारी संघटनेकडून करण्यात आली आहे. तसे निवेदन कॉँग्रेसचे नगरसेवक हेमंत सोनवणे, तसेच राहुल मंगवाणी, उमेश गायकवाड, राहुल दोडके, विशाल भोसले आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विजयकुमार ठुबे यांना दिले आहे.
जेजुरी शहरातील अतिक्रमणे हटवण्याच्या धडक मोहिमेचे स्वागत नागरिकांतून होत असून सर्वच अतिक्रमणे हटवून शहराला एक नवीन ओळख निर्माण करून द्यावी, अशी मागणी ही ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

एकीकडे स्वागत, तर दुसरीकडे नाराजी
एकीकडे या कारवाईचे स्वागत होत आहे, तर दुसरीकडे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील अनेक अतिक्रमणे ही आजी-माजी नगरसेवक वा पदाधिकाऱ्यांची असूनही त्यांनी सहकार्य केल्याची माहिती अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिक्रमणे हटवन्यात आल्यानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यानंतर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची ही माहिती मिळाली.

Web Title: Action on encroachment has been started in Jejuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.