बसस्थानकाच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:09+5:302021-06-06T04:08:09+5:30

या वेळी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष तोडकर, सुनील धुमाळ, महेश आगवणे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र ...

Action on encroachments on bus stand reserved space | बसस्थानकाच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई

बसस्थानकाच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई

Next

या वेळी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष तोडकर, सुनील धुमाळ, महेश आगवणे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अभियंता रमेश मोरे, रोहित पाटील, अतुल तोरस्कर आदींच्या उपस्थितीत कारवाई सुरू करण्यात आली. आज सकाळी आठ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आली.

सध्या बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बारामती बसस्थानकाच्या नवीन सुसज्ज इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. ही इमारत पूर्णत्वाला गेल्यानंतर शहराच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. ही बारामती बसस्थानकाची आरक्षित जागा आहे. या जागेवर शहरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून त्याठिकाणी हार्डवेअर दुकान, गॅरेज व ऑफिस उभारले होते. या अतिक्रमणधारकांना नगरपालिकेच्या वतीने काही दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या. सुरुवातीला अतिक्रमण केलेल्या एकाने या कारवाईला विरोध केला. मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष तोडकर यांनी सदर जागा बसस्थानकासाठी आरक्षित असल्याचे स्पष्ट करून याबाबतची नोटीस वाचून दाखवली. यानंतर जेसीबीच्या साह्याने हार्डवेअर दुकान, ऑफिस यांसह तीन दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, या दुकानांमध्ये असलेले ३० ते ४० लाखांचा माल ही कारवाई करण्यापूर्वी दुकान मालकाने बाहेर काढला. बस स्थानकाच्या नियोजित इमारतीच्या बांधकामानंतर या ठिकाणाहून एसटी बस बाहेर जाण्याचा हा मार्ग या ठिकाणी नियोजित आहे.

०५ बारामती

बसस्थानकाच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमणांवर सुरू असलेली कारवाई.

Web Title: Action on encroachments on bus stand reserved space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.