फ्लेक्सवर कारवाई, ‘लोकमत’च्या दणक्याने तातडीने निर्णय
By admin | Published: October 6, 2016 03:34 AM2016-10-06T03:34:20+5:302016-10-06T03:34:20+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावरील धोकादायक फ्लेक्स काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले
भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील धोकादायक फ्लेक्स काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘लोकमत’ने याबाबत आज वृत्त प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. भिगवण ठाण्याचे पोलीस अधिकारी नीलकंठ राठोड यांनी तातडीने भेट देऊन कारवाई केली. पुणे-सोलापूर महामार्गावर काही व्यावसायिक आणि सामाजिक संघटनांनी आपले जाहिरातीचे फ्लेक्स लावले होते.
या ठिकाणचे धोकादायक फ्लेक्स काढून टाकले, तसेच या जागेवर कोणीही फ्लेक्स लावू नयेत, असे आवाहन केले. फ्लेक्स लावल्यास त्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.(वार्ताहर)
पाहणी करून दिल्या सूचना
४मुख्य मार्गावरच धोकादायक स्थितीत लावलेल्या या फ्लेक्समुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. याची तातडीने दखल घेऊन भिगवण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस अधिकारी नीलकंठ राठोड यांनी येथे भेट देऊन पाहणी करून संबंधितांना तातडीने फ्लेक्स काढण्याच्या सूचना केल्या.