घाडगेवाडीत दारूअड्ड्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:14+5:302021-06-19T04:08:14+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश काटकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या कारवाईत बाळू रामचंद्र ...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश काटकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या कारवाईत बाळू रामचंद्र घाडगे याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात दारुबंदी अधिनियमासह सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे ८० हजार रुपयांचे रसायन व दारू नष्ट करण्यात आली. १५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घाडगेवाडी येथील फडतरेवस्तीजवळ नीरा नदीच्या कडेला सुरू असलेल्या हातभट्टी दारूअड्ड्यावर पंचांसह छापा टाकला. या वेळी घाडगे हा तेथे दारू गाळत असताना आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच तो झाडाझुडपांतून पसार झाला.
घटनास्थळावरून पोलिसांनी ७५ हजार रुपयांचे गावठी दारू तयार करण्याचे रसायन व चार हजार रुपयांचे लोखंडी बॅरल व अन्य साहित्य असा ८० हजारांचा माल ताब्यात घेत नष्ट केला आहे.
————————————————