शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील घरांवर पडणार हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:00 AM2018-12-11T06:00:00+5:302018-12-11T06:00:07+5:30

स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे.

action on houses of Shivajinagar railway station areas | शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील घरांवर पडणार हातोडा

शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील घरांवर पडणार हातोडा

Next
ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाकडून पोलिस, आरपीएफ व जीआरपीच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाईची तयारी मध्य रेल्वेच्या वतीने शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनच्या (डाऊन) बाजुकडील रेल्वेच्या जागेत एकुण १२९ घरे

पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेतील अनधिकृत घरे व दुकानांवर हातोडा पडणार आहे. या भागातील १५९ घरे व २७ दुकानांना नोटीस बजावण्यात आली असून येत्या शनिवारी हे अतिक्रमण हटविले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून पोलिस, आरपीएफ व जीआरपीच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाईची तयारी केली आहे. 


मध्य रेल्वेच्या वतीने शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामध्ये फलाटांचाही विस्तार प्रस्तावित आहे. तसेच प्रवाशांसाठी इतर सोयी-सुविधाही उभारण्यात येणार आहेत. मात्र, स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यापुर्वी अनेकदा स्थानिकांना जागा रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या. पण अद्याप त्यात यश आलेले नाही. आता रेल्वे प्रशासनाकडून हे अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस भुमिका घेण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनच्या (डाऊन) बाजुकडील रेल्वेच्या जागेत एकुण १२९ घरे आहेत. त्यातील ६६ घरे पुणे स्टेशनच्या दिशेला असून उर्वरित घरे खडकीच्या दिशेला आहेत. तर मुख्य फलाट क्रमांक एक (अप)च्या बाहेर एकुण २७ दुकाने आहेत. तर खडकीच्या बाजूला ३० घरे आहेत. उच्च न्यायालयाने २००३ मध्ये शिवाजीनगर स्टेशनवरील फलाटलगतच्या १० मीटर परिसरात अतिक्रमण असू नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार ही ३० घरांतील कुटूंबीयांचे महापालिकेने इतरत्र पुनर्वसनही केले. पण अद्यापही त्यांनी ही जागा सोडलेली नाही. एकुण २७ दुकानांपैकी १७ दुकानांना काही वर्षांपुर्वी रेल्वेने भाडेतत्वावर प्रत्येकी ४ चौरस मीटर जागा दिली आहे. तर १० दुकाने अनधिकृत आहेत.जागा दिलेल्या दुकानचालकांनी जादा जमीन ताब्यात घेऊन त्याचा वापर केला जात आहे. ही जागा देताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांना जागा सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.
---------------
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून एकाचवेळी १८६ घरे व दुकानांचे अतिक्रमण हटविण्याची मोठी कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी महिनाभरापुर्वी जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच काही दिवसांपुर्वी प्रत्येक घरावर नोटीस लावण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वेकडून दि. १५ डिसेंबरला कारवाई केली जाणार आहे. या कारवाईला स्थानिक नागरिकांकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. पण त्याला न जुमानण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे पोलिस, जीआरपी, आरपीएफचा मोठा फौजफाटा यादिवशी तैनात असणार आहे.
...........
रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविणे, ही प्राथमिकता आहे. हे अतिक्रमण काढण्याचा रेल्वेला अधिकार आहे. त्यानुसार तयारी करण्यात आली आहे. सर्व १८६ जणांना घरे व दुकाने रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी कारवाईपुर्वी घर-दुकानातील सामान हलवावे, असे त्यांना आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईची तयारी पुर्ण झाली आहे. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे

Web Title: action on houses of Shivajinagar railway station areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.