खते, बी-बियाणांची जादा दराने विक्री केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:04+5:302021-07-12T04:08:04+5:30

नीरा : खरीप हंगामामध्ये खते आणि बी-बियाणे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांचा कुठल्याही ...

Action if fertilizers, seeds are sold at extra rate | खते, बी-बियाणांची जादा दराने विक्री केल्यास कारवाई

खते, बी-बियाणांची जादा दराने विक्री केल्यास कारवाई

Next

नीरा : खरीप हंगामामध्ये खते आणि बी-बियाणे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा भासू देणार नाही. त्याचबरोबर जादा दराने खते विक्री करणा-यांवर कारवाई करणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

सध्या खरीप हंगामामध्ये पेरण्या जोर धरत आहेत. त्यामुळे खताची उपलब्धता महत्त्वाची मानली जाते. शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी खताचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाणे मुबलक प्रमाणात मिळतील.

सध्या महाराष्ट्रात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. खरिपाचे क्षेत्र दरवर्षीच्या तुलनेत वाढताना दिसत आहे. परंतु पावसाची नियमितता नसल्याने पेरणीने अधिकचा वेग धरला नाही. पुरंदरमध्ये साधारणतः ४३,५८१ हेक्टर क्षेत्र हे खरिपामध्ये लागवडीखाली येते. पुरंदरमधील बहुतांशी भागात पेरण्या उरकल्या आहेत. तालुक्यात भात, बाजरी, भुईमूग, कांदा, सोयाबीन, वाटाणा, ऊस, टोमॅटो आणि इतर कडधान्यांचे खरिपामध्ये उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे शेती निविष्ठा खरेदीसाठी बाजार गजबजले आहेत.

शेतीमध्ये उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा वाटा महत्त्वाचा आहे. रासायनिक खतांमध्ये प्रामुख्याने युरिया, डी.ए.पी, एम.ओ.पी, एस.एस.पी, कॉम्प्लेक्स त्याचबरोबर इतर खतांचा समावेश होतो. त्यामुळे प्रामुख्याने कृषी अर्थकारण हे रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे यांच्याभोवती फिरते. तालुक्यामध्ये खरिपाच्या एकूण ४३,५८१ हे. क्षेत्रामध्ये भात १,५०७ हे. बाजरी १४,९८३ हे. भुईमूग २,९२४ हे. कांदा ३,६८७ हे. वाटाणा २,२१४ हे. ऊस ३,०५७ हे. टोमॅटो १,५५३ हे. आणि इतर एकूण कडधान्य ४,३५१ हे. लागवडीखाली आहे. त्यामुळे लागवडी खाली असलेल्या क्षेत्राचा विचार करता. उपलब्धसाठा हा पुरेसा असल्याचे कृषी विभागाने सांगतले आहे.

बचत गटामार्फत बांधावर बियाणे व खते वाटप

पुरंदर तालुक्यातील शेतकरी बचत गटांना शेतीच्या बांधावर खते व बियाणे उपलब्ध करुण देण्यासाठी कृषी विभाग सक्रिय आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी साधारणतः ६५,९३० रुपये किमतीचे बियाणे बांधावर जाऊन शेतका-यांच्या हाती देण्यात आले. यामध्ये भैरवनाथ शेतकरी बचत गट काळदरी, हर हर महादेव शेतकरी बचत गट खरातवाडी, मुरारबाजी बचत गट काळदरी यांना १,३२५ किलो बियाणे देण्यात आले.

पुरंदर तालुक्यातील खतांची उपलब्धता (०९ जुलैपर्यंत) (उपलब्धता मे.टन मध्ये)

युरिया १९४

डीएपी ३२

एमओपी १३४

एसएसपी १६१

कॉम्प्लेक्स ८८१

एकूण १,४०२

पुरंदर तालुक्यामध्ये खते आणि बियाण्यांची पुरेश्या प्रमाणात सद्यस्थितीत उपलब्धता आहे. लागणारी खते शेतकऱ्यांनी आधार कार्ड घेऊन खरेदी करण्यासाठी जावे. कृषी निविष्ठा खरेदीच्या पावत्या शेतकऱ्यांनी घेऊन ठेवाव्यात. शेतकऱ्यांची जादा दराबाबत अथवा कृषी निविष्ठा बाबत तक्रार असल्यास सनियंत्रण कक्ष संपर्क साधावा.

एस. जी. पवार.

(कृषी अधिकारी पंचायत समिती पुरंदर)

शेतकऱ्यांनी पिकाची गरज ओळखून खतांचा वापर करावा. खरीप हंगामातील कडधान्याला युरियाची गरज नसते. त्यामुळे कडधान्यांमध्ये युरियाचा कमी वापर करावा. तालुक्यामध्ये नियमित खतांचा पुरवठा चालू आहे. सद्यस्थितीला खरीप हंगामाच्या लागवडीखालील क्षेत्राच्या तुलनेत उपलब्धसाठा हा पुरेसा आहे. कोणी जास्त किमतीने कृषी निविष्ठांची विक्री करीत असेल त्यावर आम्ही कारवाई करीत आहोत.

अंकुश बरडे.

(तालुका कृषी अधिकारी पुरंदर)

Web Title: Action if fertilizers, seeds are sold at extra rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.