बेकायदा बांधकामांवरील कारवाई तीव्र

By admin | Published: October 22, 2016 04:06 AM2016-10-22T04:06:00+5:302016-10-22T04:06:00+5:30

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिक्रमणविरोधी पथकाने हवेलीतील तब्बल १६,४०० अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्याची प्रकिया सुरू केली आहे.

Action on illegal constructions is intense | बेकायदा बांधकामांवरील कारवाई तीव्र

बेकायदा बांधकामांवरील कारवाई तीव्र

Next

 पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिक्रमणविरोधी पथकाने हवेलीतील तब्बल १६,४०० अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्याची प्रकिया सुरू केली आहे. त्यांतील साडेसात हजार बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पीएमआरडीएच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख अण्णासाहेब चव्हाण
यांनी दिली.
पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी हवेलीतील साडेसात हजार बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत साडेआठ हजार अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६च्या कलम ५३ (१) अन्वये ही कारवाई करण्यात येत असल्याचे
चव्हाण म्हणाले.
नोटीस आल्यानंतर संबंधित बांधकाम स्व-खर्चाने व स्वत:च्या जबाबदारीने काढून टाकावे लागणार असून, त्याची माहिती पीएमआरडीए कार्यालयाला कळवावी लागेल. नोटिशीवर जर ३० दिवसांच्या
आत म्हणणे कार्यालयाला न कळविल्यास अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात
येईल. याचबरोबर सदर बांधकाम पाडून त्यासाठी येणारा खर्चदेखील जमीन महसूलच्या थकबाकीप्रमाणे वसूल
करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

परवानगीविनाच बांधकामे
अनेक प्रकरणांत शासनाच्या विविध विभागांच्या परवानग्या न घेताच बांधकामे करण्यात आल्याचे समोर आले आहे.
अकृषिक वापर करण्यासाठी परवानगी
न घेणे, विनापरवाना बांधकाम करणे, घेतलेल्या परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करणे अशा पद्धतीने अनधिकृत बांधकामे झाल्याने नोटिसा दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Action on illegal constructions is intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.