शिरूर तालुक्यातील अवैध दारूधंद्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:06+5:302021-06-29T04:09:06+5:30
ईनामगाव, कुरुळी, वडगाव रासाई, नागरगाव व गणपतीमाळ परिसरात पोलिसानां मिळालेल्या माहितीनुसार: अवैध दारूधंद्यावर छापा मारून सुमारे ८७ हजार ५९० ...
ईनामगाव, कुरुळी, वडगाव रासाई, नागरगाव व गणपतीमाळ परिसरात पोलिसानां मिळालेल्या माहितीनुसार: अवैध दारूधंद्यावर छापा मारून सुमारे ८७ हजार ५९० रुपयांचा मुद्दे माल जप्त केला.
लायनूर मुरलीधर काळे, संगीता चिंतामण पवार (रा. ईनामगाव, ता. शिरूर), भास्कर वाल्मीक गिरे, वैशाली कैलास चौगुले, मंगल शरद गव्हाणे, विजयाबाई नंदू गव्हाणे (रा. कुरुळी, ता. शिरूर, वडगाव रासाई, ता. शिरूर) अश्विनी रामदास गव्हाणे,
किरण रामदास नारनोर, दासू उर्फ रामदास पांडुरंग नारनोर, नीलेश दिलीप गव्हाणे, दिलीप दिगंबर गव्हाणे, संदीप तबाजी गव्हाणे, प्रदीप तबाजी गव्हाणे, पप्पु दशरथ कोळेकर, भाउसाहेब लहू पवार (
सर्व रा. नागरगाव, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग राहुल धस, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, पी. एन. जगताप, जारवाल, पोलीस कॉन्सटेबल खुटेमाटे, होमगार्ड जगताप, रणदिवे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार जगताप, सहायक फौजदार साबळे हे करीत आहे.
--