अवैध मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Published: May 8, 2017 02:06 AM2017-05-08T02:06:36+5:302017-05-08T02:06:36+5:30

चाकण एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात कारखान्याची उभारणी सुरू असून पायाभरणीसाठी लागणारा मुरुमचोरी होत

Action on illegal pimples harassment | अवैध मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाई

अवैध मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुळी : चाकण एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात कारखान्याची उभारणी सुरू असून पायाभरणीसाठी लागणारा मुरुमचोरी होत असल्याची माहिती प्रांताधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे निघोजे माळरानावर प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने धाड टाकत मुरुमउपसा करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई केली. त्यांच्याकडून १५०० ब्रास मुरुमाचा उपसा करण्यात आला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास ही कारवाई महसूल विभागाने केली.
निघोजे व कुरुळी परिसरात बेकायदा उत्खनन करून काही व्यक्ती मुरुमचोरी होत असल्याची तक्रार प्रांताधिकारी गाढे यांच्याकडे करण्यात आली होती.
या माहितीच्या आधारे निघोजे माळरानावर गाढे यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास गाढे यांच्या पथकाने मुरुमउपसा करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. महसूल विभागाच्या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने सापळा लावून दोन डंपर जप्त केले.  या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर  उत्खनन करून अवैधरीत्या  गौणखनिज लंपास केल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले  आहे.

निघोजे (ता. खेड) येथील जमीन गट नंबर २७८/१ अ, क्षेत्र ४.४६ आर येथे महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे. मुरुम टाकलेल्या ठिकाणी ८० बाय ६५ चौमी जागेवर ८ ते ९ फूट उंचीचा मुरुमाचा भराव करण्यात आल्याचे व त्यासाठी तब्बल १२०० ते १५०० ब्रास मुरुम टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुरुळी व निघोजेमधील अन्य ठिकाणचेही पंचनामे करण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी घटनास्थळी पकडण्यात आलेली वाहने चाकण पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. त्यातील दोन डंपरवर (एमएच १२ एफसी ६६४७) हा एकच क्रमांक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
याची आरटीओकडून चौकशी करण्याचे व उत्खननाबाबतची चौकशी कार्यवाही पूर्ण होईपर्यंत संबंधित वाहने न सोडण्याचे पत्र पोलिसांना दिले आहे. कारवाईमुळे गौणखनिजचोरी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Action on illegal pimples harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.