वडगाव निंबाळकर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:37 AM2018-12-16T01:37:24+5:302018-12-16T01:37:48+5:30
नऊ जणांवर गुन्हा दाखल : १ लाख ३ हजार रुपयांचा माल जप्त
वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर पोलिसांनी शनिवारी (दि. १५) सायंकाळी पाचच्या सुमारास अवैध धंद्यावर धडक कारवाई
केली. यामध्ये दोन ठिकाणी मटक्यावर, दोन अवैध दारू विक्रेत्यासह, तर एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत रोख रकमेसह,
एक दुचाकी असा एकूण एक लाख ३ हजार ३६५ रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव निंबाळकर येथील बाजारतळावर जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे आपल्या सहकाऱ्यांबरोबर शहानिशा करण्यासाठी गेले होते. यावेळी चंद्रकांत घोडेकर, रघुनाथ लोणकर, अकबर भालदार, विजय शिंदे, सिकंदर भालदार, स्वप्निल झगडे (सर्व रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) पैशावर पत्ते खेळताना आढळून आले. सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्याकडे रोख १ हजार १७५ रुपयांसह बुलेट (एमएच ११ सीए ७७७६) दुचाकी मिळून आली. पोलिसांनी सर्व माल जप्त केला आहे. दुसरी कारवाई येथील माळीवस्ती परिसरात चालवल्या जात असलेल्या मटका अड्ड्यावर केली. येथील मारुती मंदिराजवळ शिवाजी साळवे याला मटका चिठ्ठी फाडताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक हजार १४५ रुपयांसह मटका, जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले आहे.
कोºहाळे बुद्रुक येथील बाजारतळावर सयाजी चव्हाण
(रा. समतानगर कोºहाळे बुद्रुक
ता. बारामती) याला मटका चिठ्ठ्या फाडताना पकडले आहे. एक
हजार १४५ रुपयांसह मटका साहित्य ताब्यात घेतले. मुढाळे येथील
लाला खोमणे याला बेकायदा देशी दारू विकताना पकडले, याच्यावर
गुन्हा नोंदवला आहे.
...छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया जवळपास सर्वच गावांमध्ये छुप्या पद्धतीने मटका, जुगार, अवैध दारूधंदे सुरू आहेत. हद्दीतील सोमेश्वरनगर या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणावर मटका व्यवसाय सुरू आहे. सोशल मीडियाच्या जगात आता मटका खेळणारे ही मटक्याची चिठ्ठी फाडायला जाण्यापेक्षा मटका लावण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. याकडेही पोलिसांनी वेळेत लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.