चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:25 AM2018-08-30T00:25:40+5:302018-08-30T00:26:15+5:30
३५ वाहनांवर दंडात्मक कारवाई : ७ हजार रुपयांचा दंड वसूल
नारायणगाव : येथील शहरातील पुणे - नाशिक महामार्ग, मुख्य बाजारपेठ, जुन्नर रस्ता व खोडद रोडवर बेशिस्त पार्किंग करणाºया ३५ वाहनांवर कारवाई करून ७ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे , अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली नारायणगाव पोलिसांनी वाहतूक संदर्भ पोलिसांनी बैठक घेऊन बेशिस्त वाहतूक करणाºया वाहनचालकांवर कारवाई चा इशारा दिला होता.
रस्त्यांवर विविध वस्तू, फळे विक्री करणारे गाळा धारक, हातगाडी वाले, खाजगी प्रवाशी वाहतूक करणाºया जीप, रिक्षा, टेम्पो आदींनी वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये अशी सूचना केली होती. तसेच सूचनांचे पालन न करणाºयावर खटले भरले जातील असा इशारा दिला होता. त्यानुसार खोडद रोडवर १२ वाहने पुणे नाशिक महामार्गावर १२ व जुन्नर रोडवर ११ जणांवर कारवाई केली. तसेच पासून सरपंच बाबू पाटे व त्यांच्या सहकाºयांनी गावातून प्रभात फेरी काढून बेशिस्त वाहने बाजूला करावीत असे आवाहन केले. त्यानंतर अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, राहुल गोंधे, पोलीस वाहतूक नियंत्रक शामसुंदर जायभाये, सचिन कोबल, होमगार्ड गणेश बेल्हेकर यांनी जॅमर लावून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. तसेच पोलीस जीप मध्ये माईकद्वारे सूचना देण्यात आली, या सूचनेचे पालन न करणारयांवर खटले दाखल करण्यास सुरुवात केली .
या कारवाईत पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम एस तलवार, हवालदार संदीप देवकर, एस जी शिंदे व ट्रॅफिक वार्डन यांनी भाग घेतला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी स्टेशन, लोणी काळभोर फाटा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व उरुळी कांचन या ठिकाणी महामार्गावर अस्ताव्यस्त पार्किंग करणाºया वाहनांवर आगामी काळात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
१२ कारला जॅमर, २४00 रुपयांचा दंड वसूल
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाºया १२ कारवर दंडात्मक कारवाई करुन २४00 रुपये दंड वसूल केला. पुणे-सोलापूर महामार्गावर अस्ताव्यस्त कार पार्किंग केले जाते. या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होतो. तसेच त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांनी अशा अस्ताव्यस्त पार्किंग केलेल्या कारवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे संबंधितांनी वाहने पार्क करताना व्यवस्थित पार्क करावीत. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील.