बीआरटी मार्गातील घुसखोरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:08 AM2017-08-04T03:08:15+5:302017-08-04T03:08:15+5:30

शाहदावल बाबा चौक ते संगमवाडी बीआरटी धोकादायक मार्गात घुसखोरी संदर्भात दैनिक ‘लोकमत’मध्ये ३१ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तत्काळ दखल

 Action on Intruders in BRT Road | बीआरटी मार्गातील घुसखोरांवर कारवाई

बीआरटी मार्गातील घुसखोरांवर कारवाई

Next

विमाननगर : शाहदावल बाबा चौक ते संगमवाडी बीआरटी धोकादायक मार्गात घुसखोरी संदर्भात दैनिक ‘लोकमत’मध्ये ३१ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तत्काळ दखल घेत वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सलग दोन दिवस कारवाई करून सुमारे शंभरहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून दंडाची वसूली करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून सुरक्षारक्षकांशी दमदाटी करीत हुज्जत घालण्याचे प्रकार वारंवार घडत होते. गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी बीआरटी मार्गातील अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे.
संगमवाडी ते शाहदावल बाबा चौक तसेच विश्रांतवाडी बीआरटी मार्गात वाहनचालक घुसखोरी करीत वाहने चालवितात. त्यामध्ये बीआरटी मार्गावरील सुरक्षारक्षकांना दमदाटीचेही प्रकार घडत होते. महागड्या गाड्यांमधील घुसखोरी करणारे हे नियम मोडणारे वाहनचालक त्यांना अडविल्यास शिवीगाळ व दमदाटी करतात. या सर्व गंभीर परिस्थितीचा आढावा ‘लोकमत’मधील वृत्तात घेतला होता. दिवसेंदिवस घुसखोरी करणाºया घटनांचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच होते. हे वाहनचालक स्वत:बरोबरच दुसºयांचाही जीव धोक्यात घालून अपघाताला कारणीभूत ठरत होते. मागील आठवड्यात एका तरुणाचा संगमवाडी बीआरटी मार्गात अपघातात जागीच मृत्यू झाला होता. या परिस्थितीची दखल घेऊन त्याचा लेखाजोखा प्रसिद्ध झालेल्या वृत्तात मांडण्यात आला होता.
या वृत्ताची तत्काळ दखल घेत येरवडा वाहतूक विभागाने सलग दोन दिवस बीआरटी मार्गातील घुसखोरांवर कारवाई केली. यामध्ये पहिल्या दिवशी ५७ तर दुसºया दिवशी ६१ अशा एकूण ११८ घुसखोरी करणाºया वाहनचालकांवर दंडाची कारवाई करण्यात आल्याची माहिती येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बी. जी. मिसाळ यांनी दिली.

Web Title:  Action on Intruders in BRT Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.