गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई
By admin | Published: May 9, 2017 03:24 AM2017-05-09T03:24:08+5:302017-05-09T03:24:08+5:30
चऱ्होली (चोविसावाडी) आणि मोशी परिसरातील पंधरा अवैध खडी क्रशरधारकांवर पिंपरी-चिंचवड प्रशासनाने छापा टाकून
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : चऱ्होली (चोविसावाडी) आणि मोशी परिसरातील पंधरा अवैध खडी क्रशरधारकांवर पिंपरी-चिंचवड प्रशासनाने छापा टाकून संबंधितांची वीजजोडणी बंद केली आहे. तर अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ५४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे बेकायदा गौणखनिज, माती व मुरूम उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आळंदीलगत असलेल्या चोविसावाडी तसेच मोशी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध खडीक्रशर, अवैध मुरूम तसेच गौणखनिज वाहतूक केली जात होती.
याबाबत पिंपरी-चिंचवड प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. तसेच हवेलीच्या प्रांतधिकारी ज्योती कदम यांनी परिसरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित तहसीलदार, मंडलाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.