दोन दिवसांत २ ठिकाणी खुनी हल्ला करत कॅश लुटणाऱ्या मामा-भाचे टोळीवर मोक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 04:07 PM2021-04-15T16:07:48+5:302021-04-15T16:08:23+5:30

हे दोन्ही गुन्हे हे एकूण नऊ आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Action by Mocca act on Mama- bhacche gang who robbed cash by carrying out half murder attacks in 2 places in two days | दोन दिवसांत २ ठिकाणी खुनी हल्ला करत कॅश लुटणाऱ्या मामा-भाचे टोळीवर मोक्का

दोन दिवसांत २ ठिकाणी खुनी हल्ला करत कॅश लुटणाऱ्या मामा-भाचे टोळीवर मोक्का

Next

पुणे : शहरात एक नवीन टोळी सक्रीय झाली असून,दोन दिवसांत दोन ठिकाणी खुनी हल्ला करून कॅश लुटणाऱ्या मामा भाचे टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे दोन्ही गुन्हे हे एकूण नऊ आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रोडवरील अरण्येश्वर कॉर्नर येथील व्ही. आर. गुप्ता, देशी दारूचे दुकान, सुप्रील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे 6 व्यक्तींनी दुकानात घुसून दुकानाचे मॅनेजर व कामगाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत पालघनने व दारू मोजण्याच्या लोखंडी मापाने मारहाण करून त्यांच्याकडून 57,000- रु. जबरदस्तीने हिसकावून नेले होते. . 

याबाबत दुकानाचे मॅनेजर (वय-42, रा. बावधन, मुळशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दि. 4 एप्रिलला 7 वाजण्याच्या सुमारास सुमारास स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण थिएटर समोर ब्रिजखाली एका 50 वर्षीय वृत्तपत्र विक्रेत्याला चाकूने धमकावून त्यांच्याजवळील पेपर विक्रीचे जमलेले एकूण 90,300/- रु. असलेली बॅग अनोळखी व्यक्तींनी हिसकावून नेली होती. याबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना दत्तवाडी पोलिसांनी गौरव फडणीस (वय-30 वर्षे, रा. पर्वती दर्शन, पुणे) व अक्षय गरुड (वय-20 वर्षे, रा. व्ही.आय.टी. कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर, पुणे) या दोन आरोपींना अटक केली होती.  या दोघांसह  सचिन पांडुरंग सोंडकर (वय-31वर्षे, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे),  महादेव सुरेश नंदुरे (वय-20वर्षे, रा. दत्तनगर, कात्रज, पुणे)  चिराग संजय देशमुख (रा. खोपडेनगर, कात्रज, पुणे) यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यातील चार आरोपींवर वारजे पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल आहे. 

या आरोपींकडे पोलिसांनी आणखी चौकशी केली असता आरोपी ऋषिकेश उर्फ हुक्या श्रीकांत गाडे (रा. व्ही.आय.टी. कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर,बिबवेवाडी, पुणे) याने स्वत:च्या नेतृत्वाखाली संघटीत टोळी तयार केली आहे. त्याने व त्याच्या टोळीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागात अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी, गंभीर दुखापती,अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे घेऊन दहशत माजविणे यांसारखे गुन्हे करून वर्चस्व निर्माण करणे असे गुन्हे केल्याची वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे. तर आरोपी गाडे याने स्वतंत्रपणे 57 गुन्हे केल्याची अशी एकूण 66  गुन्हे केल्याची नोंद पोलिसांना आढळून आली आहे.

टोळीप्रमुख ऋषिकेश उर्फ हुक्या गाडे याने  टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याच्या उद्देश्याने संघटीत गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालू ठेवले. तसेच या टोळीने बेकायदेशीर मार्गाने आर्थिक व इतर फायदा मिळविण्यासाठी वरील गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी या गुन्ह्याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना सादर केला. त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. त्याप्रमाणे वरील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून या गुन्ह्याचा पुढील तपास स्वारगेट विभागाच्या सहा. पोलीस आयुक्त  सुषमा चव्हाण करीत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------

Web Title: Action by Mocca act on Mama- bhacche gang who robbed cash by carrying out half murder attacks in 2 places in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.