Pune | बावीस गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 02:57 PM2022-11-16T14:57:27+5:302022-11-16T15:01:32+5:30
पोलिसांची चाहूल लागताच आरोपी लखन भोसलेने पळ काढला होता...
सांगवी (बारामती) : एकूण सहा पोलीस ठाण्यात मोक्का, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयातील कुख्यात आरोपीला पुणे ग्रामीण पोलीसांनी बारामती तालुक्यातील घाडगेवाडी येथून पाठलाग करत अटक केली आहे. त्यानुसार आरोपी भोसले हा मंगळवार( दि. 15) रोजी घाडगेवाडी, (ता. बारामती) येथे एका घरासमोर उभा दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी लखन भोसलेने पळ काढला होता. साधारण एक किलोमीटर पाठलाग करून अखेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
लखन ऊर्फ महेश पोपट भोसले, रा. वडगाव जयराम स्वामी, (ता.खटाव, जि.सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पुणे येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे व स्वप्निल अहिवळे यांना आरोपी लखन ऊर्फ महेश भोसले हा घाडगेवाडी, (ता. बारामती) आल्याची गोपनीय माहिती मिळाली खबर होती. त्यानुसार आरोपी भोसले हा मंगळवार( दि. 15) रोजी घाडगेवाडी, (ता. बारामती) येथे एका घरासमोर उभा दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी भोसलेने पळ काढला होता. साधारण एक किलोमीटर पाठलाग करून अखेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला. स्थानिक गुन्हे शाखेसह, बारामती तालुका पोलीस ठाणे, माळेगाव पोलीस, वडगाव निंबाळकर पोलिसांनी सापळा रचत आरोपीचा पाठलाग करत अटक केली.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित पाटील, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, मुकुंद कदम, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, हिरालाल खोमणे, हृदयनाथ देवकर, पोलीस मित्र दादा कुंभार, राम कानगुडे, अमोल नरुटे, दीपक दराडे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे यांची पथके तयार करून आरोपीच्या मुसक्या आवळया आहेत.