पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

By admin | Published: May 13, 2017 04:44 AM2017-05-13T04:44:04+5:302017-05-13T04:44:04+5:30

दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापौरांनी तातडीची बैठक घेऊन प्रशासनास धारेवर धरले.

Action on the officials if the water supply is not smooth | पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापौरांनी तातडीची बैठक घेऊन प्रशासनास धारेवर धरले. ‘शहराच्या सर्व भागांमध्ये दिवसाआड समान तसेच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
महापालिका परिसरात दिवसाआड पाणीपुरठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे महापौर कार्यालयात पाणी नियोजनाबाबत आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, नगरसदस्य तुषार कामठे, बाळासाहेब ओव्हाळ, नगरसदस्या सुवर्णा बुर्डे, माजी नगरसदस्य सुरेश म्हेत्रे, सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत, जयंत बरशेट्टी, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘पाणीपुरवठ्याविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणीपुरवठा
विभागाने नियोजन करायला हवे. तातडीने नागरिकांच्या तक्रारीची दखल घ्यायला हवी. पाणीपुरवठा सुरळीत करावा. समान पाणीवाटप करावे.’’

Web Title: Action on the officials if the water supply is not smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.