रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई सुरू, पालिकेने केले १५ दिवसाचे नियोजन

By राजू हिंगे | Published: July 15, 2024 09:18 PM2024-07-15T21:18:58+5:302024-07-15T21:19:28+5:30

पालिकेने रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी १५ दिवसाच्या कारवाईचे नियोजन केले आहे.

Action on road encroachment started, municipality made 15 days planning | रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई सुरू, पालिकेने केले १५ दिवसाचे नियोजन

रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई सुरू, पालिकेने केले १५ दिवसाचे नियोजन

पुणे : शहरातील रस्ते आणि पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणावर पुणे महापालिका प्रशासनाने आजपासुन कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या पाच उपायुक्त कार्यालयाच्या हददीतील एका क्षेत्रीय कार्यालयात रोज कारवाई केली जाणार आहे. पालिकेने रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी १५ दिवसाच्या कारवाईचे नियोजन केले आहे.

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. प्रत्येक दहा फुटांवर गाडी आहे. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार याची माहिती देऊनसुद्धा कारवाई होत नाही. अशा तक्रारी भाजपच्या माजी नगरसेवकांनी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पालिकेत घेतलेल्या बैठकीत केल्या होत्या. त्यावर अतिक्रमण कारवाई करताना कोणत्या राजकीय पदाधिकाऱ्याचा फोन केला, तरी त्यांचे ऐकू नका. रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यास प्राधान्य द्या, तत्काळ कारवाई करा,’ असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापलिका प्रशासनाला दिले होते.

शहरातील रस्ते आणि पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणावर पुणे महापालिका प्रशासनाने आजपासुन कारवाई सुरू केली आहे. धनकवडी, सहकारनगर, नगर रोड क्षेत्रिय कार्यालयाने रस्त्यावरील आणि पदपथांवरील अतिक्रमणावर कारवाई केली.

पालिकेच्या पाच उपायुक्त कार्यालयाच्या हददीतील एका क्षेत्रीय कार्यालयात रोज कारवाई केली जाणार आहे. पालिकेने रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी १५ दिवसाच्या कारवाईचे नियोजन केले आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.यांनी दिली.

Web Title: Action on road encroachment started, municipality made 15 days planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे