उरुळी कांचन पोलिसांची रोडरोमिओंवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:37 AM2019-01-10T00:37:29+5:302019-01-10T00:37:45+5:30
देसाई महाविद्यालय : दंडात्मक मोहिम
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या परिसरात; तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेर उभे राहून विद्यार्थिनींची छेड काढणे, घोळका करून गोंधळ घालणे, अन्य विद्यार्थ्यांना दमदाटी करून मारहाण करणे, विनापरवाना दुचाकी चालवणे, दुचाकीवर तिघांनी बसून गोंधळ घालत मोठ्या आवाजात दुचाकी चालवत, वाहतुकीला अडथळा निर्माण करीत वाहने उभी करून अथवा रस्त्यात दुचाकी वाहने लावून त्यावर बसून विक्षिप्त अंगविक्षेप करणे अशासारखी समाजविघातक कृत्ये करून शांतता भंग करणाऱ्या रोडरोमिओंवर बुधवारी, दि. ९ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली.
या गोष्टींना आळा घालण्यासाठी येथील पोलिसांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र, गाडीचे लायसन्स नसलेल्या विद्यार्थ्यांना; तसेच परिसरात अनधिकृतरीत्या फिरणाºया तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर समज म्हणून दंडात्मक कारवाई करीत यापुढे कडक फौजदारी कारवाईचे संकेत दिले. पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस नाईक सोमनाथ चितारे, पोलीस हवालदार अमोल भोसले, पोलीस नाईक सचिन पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. महाविद्यालयामध्ये प्रवेश नसूनही परिसरात आणि गेटवर उभे राहून टवाळक्या करणाºया रोडरोमिओंवर प्राधान्याने ही कारवाई करण्यात आली. ज्याच्याकडे ओळखपत्र नाही अशा विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना बोलावून त्यांना ताकीद देण्यात येणार आहे; तसेच इतर शांतता भंग करणाºया युवकांवर फौजदारी कायद्यांतर्गत कारवाई केली
जाणार आहे.