कोऱ्हाळेमध्ये रोडरोमिओंवर धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:33 AM2018-08-27T00:33:33+5:302018-08-27T00:33:50+5:30
६४ जण जाळ्यात : १६ हजार २०० रुपये दंड वसूल, पोलिसांच्या कामगिरीमुळे रोडरोमिओंच्या मनात धास्ती
वडगाव निंबाळकर / सुपे : शाळा- महाविद्यालयांच्या बाहेर वेगाने गाडीवर जाऊन मोठमोठ्याने हॉर्न वाजवणाऱ्या टवाळखोर रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी शनिवारी (दि. २५) वडगाव निंबाळकर पोलीस रस्त्यावर उतरले. पोलिसांनी हद्दीतील सोमेश्वरनगर ते कोºहाळे बुद्रुक परिसरातील शाळा-महाविद्यालयांच्यासमोर नाकाबंदी करून वेगाने व बेशिस्त चालणाºया रोडरोमिओंवर धडक कारवाई करीत १६ हजार २०० रुपये दंड वसूल केला.
शाळा, कॉलेजमध्ये येणाºया मुलींना, तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारी तरुणींची, महिलांची छेडछाड, रोडरोमिओंचा होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष यामुळे कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार सर्रास चालतात. त्यातच शाळा-कॉलेजच्या बाहेरून गाडीवर वेगाने जाणे, शाळा-कॉलेजच्या प्रवेशद्वारावर तासन्तास दुचाकी उभी करुन त्यावर गप्पा मारत बसणे, प्रवेशद्वारावर विद्यार्थिनींची छेड काढणे, जोरजोराने हॉर्न वाजवणे, याचा त्रासही आता कॉलेजच्या आवारात वाढला आहे. याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, प्रवेशद्वारावर बसलेल्या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक आले, तर हे टवाळखोर दुचाकी घेऊन वेगाने निघून जात होते. त्यामुळेच दुचाकीवर फिरणाºया या टवाळखोरांवर कारवाई करण्यासही मयार्दा येत होत्या. परंतु शनिवारी मात्र सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिसांनी सोमेश्वरनगर ते कोºहाळे बुद्रुक परिसरात रस्त्यांवर नाकाबंदी करून कारवाई केली. बºयाच वेळा कॅम्पसच्या आवारामध्येही बंदी असताना दुचाकी वाहने घेऊन काही जण फिरतात. शनिवारी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे आता या प्रकाराला आळा बसणार आहे. शालेय विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यांनींनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असले, तरी यामध्ये सातत्य ठेवण्याची गरज असल्याच्या भावानाही यावेळी व्यक्त केल्या. २ रोडरोमिओंवरील कारवाईत सातत्य राखले जाणार असून, यापुढे सातत्याने शाळा- महाविद्यालय भरणाच्या सुटण्याच्या कालावधीत ही कारवाई सुरूच ठेवली जाईल. तसेच प्रमुख मार्गांवर वाहनांच्या तपासणीची मोहीम प्रभावीपणे राबविणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले.
फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करणारे, ट्रिपलसीट फिरणारे, लायसन्स नसणारे, विना नंबरच्या गाड्या घेऊन फिरणारे, जोरजोराने हॉर्न वाजवणारे अशा बेशिस्त वाहनचालकांच्या गाड्या पकडून ६४ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १६ हजार २०० रुपये दंड वसूल केला. शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश नसलेल्या किंवा आयकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश न करण्याच्या सूचनाही दिल्या. या प्रकारामुळे रोडरोमिओंनी पोलिसांची धास्ती घेतली आहे.
पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचं परिसरात कौतुक होत आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच टवाळखोर विद्यार्थ्यांकडून वाहने आडवी लावली जातात. याबाबत शाळा प्रशासन, सुरक्षारक्षकांनी जाब विचारल्यास त्यांना दमबाजी करण्यात येते.