वाळू वाहतूकदारांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 01:18 AM2018-10-25T01:18:11+5:302018-10-25T01:18:17+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी गावच्या हद्दीतील शेवाळेवाडी येथे अवैध वाळू विक्री होत असलेल्या होलसेल मार्केटवर महसूल पथकाने बुधवारी (दि. २४) सकाळी धाड टाकून कारवाई केली.
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी गावच्या हद्दीतील शेवाळेवाडी येथे अवैध वाळू विक्री होत असलेल्या होलसेल मार्केटवर महसूल पथकाने बुधवारी (दि. २४) सकाळी धाड टाकून कारवाई केली. कारवाईमध्ये वाळूचे दहा ट्रक महसूल पथकाने ताब्यात घेतले आहेत. मात्र, यावेळी वाहनचालकांनी वाहनांच्या चाव्या काढून पोबारा केल्याने महसूलने ताब्यात घेतलेली वाहने पुढील कार्यवाहीसाठी प्रांत कार्यालयात नेताना महसूल पथकाची चांगलीच दमछाक झाली.
हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी स्वत: महसूल पथकासमवेत थांबल्याने महसूल पथकाचे मनोधैर्य उंचावले आहे. हवेलीमध्ये अवैधपणे वाळूउपसा व वाहतूक होत असल्याचे निर्दशनास आल्याने हवेलीचा नव्याने पदभार स्वीकारलेले तहसीलदार सुनील कोळी यांनी अवैधपणे गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. महसूलचा दंड व आरटीओ विभागाचाही दंड आकारून पुढील कार्यवाही होणार आहे.
हडपसरच्या मंडलाधिकारी तेजस्विनी साळवेकर, थेऊरचे मंडलाधिकारी चंद्रशेखर दगडे, उरुळी कांचनचे मंडलाधिकारी दीपक चव्हाण यांच्यासमवेततलाठी शिवाजी देशमुख, श्रीकृष्ण शिरसाट, मधुकर भांबळे, गणेश सुतार, दिलीप पलांडे, योगिराज कनिचे, गोकुळ भगत, अर्चना वणवे, प्रदीप जवळकर, कोतवाल नामदेव शिंदे, सुरेश तंगाडे, रवी घुले, संतोष तंगाडे, दशरथ वगरे, रतन हिंगणे, अविनाश वाघमारे, अनिल महाडिक, जीवन म्हस्के, गौतम गायकवाड या महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई केली आहे. जिल्ह्णातील दौंड, इंदापूर तालुक्यामधून, तसेच सोलापूर व अहमदनगर जिल्ह्णातील काही भागांतून पुणे शहराकडे व उपनगरात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू विक्रीसाठी येत असते. मंडलाधिकारी, तलाठी व कोतवाल सातबारा संगणकीकरणाच्या कामामध्ये कित्येक महिने व्यस्त असल्याने अवैधपणे वाळूउपसा व वाहतूक करणाºया माफियांचे फावले आहे.
>कारवाईमध्ये दहा वाळूची वाहने ताब्यात घेतली असून ती वाहने हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात जमा करणार आहोत. प्रत्येकी वाहनात सुमारे चार ब्रास वाळू असून कोणत्याही वाहनधारकाकडे शासकीय चलन आढळून आले नाही. या कारवाईमधून अंदाजे ३५ लाखांचा महसूल शासनाला जमा होणार आहे. शासकीय चलनाद्वारे दंड वसूल केल्यानंतर हमीपत्र घेऊनच कायदेशीर बाबी तपासल्यानंतर वाहने सोडली जाणार आहेत.
- सुनील कोळी, तहसीलदार, हवेली
जकातनाका ते मांजरी बाजार समिती यादरम्यान या वाळूचे ट्रक वाळू भरून रात्रीच्या वेळी येऊन थांबतात. पहाटेपासून ११ वाजेपर्यंत गरजवंत येथे येतात. व्यवहार ठरला की ती वाळू खाली करण्यासाठी ट्रक रवाना होतात.
पाचपट दंंडासहित प्रतिब्रास २ लाख रुपये शास्तीची रक्कम असा प्रतिट्रकवर ३ लाख ५० हजार दंड होणार आहे. ३५ लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहेत. परिवहन विभागही या ट्रकवर दंडात्मक कारवाई करणार आहे.