टाकळीहाजी येथे वाळूतस्करांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:16 AM2017-11-24T01:16:20+5:302017-11-24T01:16:35+5:30

टाकळी हाजी : परिसरात महसूल विभागाने वाळूतस्करांवर कारवाई करून सात वाळू ट्रक पकडले.

Action on the sandwiches at Taklihaji | टाकळीहाजी येथे वाळूतस्करांवर कारवाई

टाकळीहाजी येथे वाळूतस्करांवर कारवाई

googlenewsNext

टाकळी हाजी : परिसरात महसूल विभागाने वाळूतस्करांवर कारवाई करून सात वाळू ट्रक पकडले. तहसीलदार रणजित भोसले, सह नायब तहसीलदार डी. के. जाधव, मंडल अधिकारी रमेश वाल्मीकी, पी. एम. गोसावी, बी. व्ही. कावळे, एस. आर. नलावडे, प्रमोद लोखंडे हे या पथकामधे सहभागी झाले होते. शिक्रापूर येथे पाच ट्रक, तर आमदाबाद येथून दोन ट्रक जप्त करण्यात आले.
टाकळी हाजी परिसरात अवैध वाळूउपशाबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. याची दखल घेऊन महसूल विभागाने ही कारवाई केली. प्रत्येक ट्रकमधून जवळपास ४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. शिरूर परिसरातही या प्रकारची कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title: Action on the sandwiches at Taklihaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे