शिक्रापूर बोगस कोविड हॉस्पिटलवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:14+5:302021-04-24T04:12:14+5:30
शिक्रापूर येथे आधार हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल सुरु करून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना कोविड सेंटर उभारून कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांच्या ...
शिक्रापूर येथे आधार हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल सुरु करून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना कोविड सेंटर उभारून कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांच्या भीतीचा वापर करून रुग्णांना दाखल करून घेत बनावट पद्धतीने हॉस्पिटल सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना मिळाली, त्यानंतर शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजीनाथ काशीद, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, तलाठी अविनाश जाधव आदींनी या ठिकाणी पाहणी केली. सदर हॉस्पिटल हे डॉ. निखिल इंगळे यांच्या नावावर नोंदणी असून येथील रुग्णांवर रामेश्वर बंडगर हा इसम उपचार करत असल्याचे तसेच या ठिकाणी सोळा रुग्ण उपचार घेत असून प्रत्येकाकडून सदर डॉक्टरने पन्नास हजार रुपये जमा करून घेतले आहे. तसेच यापैकी फक्त पाच रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आलेली आहे, तर अकरा रुग्णांचे फक्त रक्त तपासून दाखल करून घेतले असल्याचे समोर आले. प्रशासनाने येथील सर्व रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये हलविले आहे.तर येथील रामेश्वर विठ्ठलराव बंडगर, गजानन विठ्ठलराव बंडगर, प्रशांत राजाराम मोरे, राहुल बाळासाहेब पवळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिक्रापूर येथे आढळून आलेल्या बोगस हॉस्पिटलवर कारवाई करताना (धनंजय गावडे)