विसर्जन हौद घोटाळ्यावर कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:16+5:302021-09-15T04:15:16+5:30

पुणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी ११ दिवस ६० विसर्जन हौदांचा सव्वाकोटी रुपयांचा खर्च करण्याच्या प्रकाराची चौकशी व्हावी, संबंधित अधिकाऱ्यांवर ...

Action should be taken on the immersion tank scam | विसर्जन हौद घोटाळ्यावर कारवाई व्हावी

विसर्जन हौद घोटाळ्यावर कारवाई व्हावी

Next

पुणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी ११ दिवस ६० विसर्जन हौदांचा सव्वाकोटी रुपयांचा खर्च करण्याच्या प्रकाराची चौकशी व्हावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, उत्सव १० दिवसांचा आहे. त्यातही पाचव्या, सातव्या व दहाव्या दिवशी सर्वधिक विसर्जन होत असते, मग ११ दिवसांसाठी हौदाची व्यवस्था कशासाठी, मागील वर्षी ३० हौद होते, यावर्षी ६० का, एका ठिकाणी असलेल्या हौदात विसर्जन करण्याची सवय असताना फिरत्या हौदांची व्यवस्था कशासाठी, त्यासाठी सव्वाकोटी रुपयांचा म्हणजे एका हौदाला रोज १९ हजार १२१ रुपयांचा खर्च कोणाच्या संमतीने झाला असे अनेक प्रश्न यात निर्माण होतात. त्यामुळेच या सर्व प्रकाराची चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

Web Title: Action should be taken on the immersion tank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.